Team WebNewsWala
मनोरंजन शहर

पावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा आगामी चित्रपट टायगर 3 ला खूप मोठा फटका बसला आहे. या सिनेमासाठी सर्व टीमने खूप मेहनत घेतली होती.

पावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका

Webnewswala Online Team – बॉलिवूडचा भाईजान उर्फ अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा आगामी चित्रपट टायगर 3 ला खूप मोठा फटका बसला आहे. या सिनेमासाठी सर्व टीमने खूप मेहनत घेतली होती. मात्र ही मेहनत वाया गेली आहे. टायगर 3 सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात होण्याआधीच सेटचे खूप मोठे नुकसान झाले आहे. ज्यामुळे निर्मात्यांना देखील मोठा तोटा झाला आहे. लॉकडाऊन पूर्वी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सेट उभारण्यात आला होता. पण कोरोना व्हायरसचा वाढता थैमान पाहाता चित्रीकरण बंद करण्यात आले.

सलमान खानचा सुपरहिट ठरलेला चित्रपट टायगर अभी जिंदा है या चित्रपटाचा सीक्वल टायगर 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. या सिनेमात सलमान सोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत झळकणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली जात आहे. दरम्यान ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, ‘टायगर 3’ चित्रपटाचा सेट दुसऱ्या ठिकाणी उभारण्यात आला आहे. दुसऱ्यांदा सेट तयार करण्यासाठी तब्बल अडीचशे ते तिनशे कामगारांची मदत लागली. पण लॉकडाऊनमुळे सेटचा उपयोग झाला नाही. मुंबईत पावसाने देखील जोर धरला आणि ‘टायगर 3’ चित्रपटाचा सेट उध्वस्त झाला.

Web Title – पावसाने ‘टायगर ३’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका ( The set of ‘Tiger 3’ was devastated, a blow of crores )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पर्यावरण पुरक गणेशोत्सव साठी Roatary Club Of Dombivali Midtown सज्ज

Team webnewswala

MumUni School of Thoughts – समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न

Team webnewswala

नवपदवीधरांना MTDC त काम करण्याची संधी

Team webnewswala

1 comment

पावसान&#237... June 11, 2021 at 1:34 pm

[…] अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा आगामी चित्रपट टायगर 3 ला खूप मोठा फटका बसला आहे. या सिनेमासाठी सर्व टीमने खूप मेहनत घेतली होती.  […]

Reply

Leave a Reply