Team WebNewsWala
अर्थकारण नोकरी राष्ट्रीय

लवकरच बदलु शकतात ग्रॅच्युईटीचे नियम

The rules of gratuity may change soon
पाच वर्षांपेक्षा कमी नोकरी झालेल्यांना मिळणार फायदा

एकाच नोकरीत पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ काम केल्यासच सध्या ग्रॅच्युईटीचा फायदा कर्मचाऱ्यांना मिळतो. मात्र, सरकारने आता ग्रॅच्युईटीचे नियम बदल करण्याच्या विचारात आहे. या नव्या नियमानुसार पाच वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी झाल्यासही ग्रॅच्युईटी मिळू शकणार आहे.

सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नोकऱ्यांमध्ये असुरक्षितता आणि अन्य कारणांमुळे लोक कायम नोकऱ्या बदलत राहतात. त्यामुळे ग्रॅच्युईटीसाठी पाच वर्षांचा नियम व्यवहारिक म्हणता येणार नाही. मिंट या वेब पोर्टलच्या वृत्तानुसार, अनेक वर्षांपासून ग्रॅच्युईटीचे नियम बदलण्याची मागणी होत आहे. यावर सरकारने आता विचार सुरु केला आहे.

सामाजिक सुरक्षा कायद्यामध्ये समावेश होण्याची शक्यता

संसदेच्या स्थायी समितीने देखील ग्रॅच्युईटीची मर्यादा कमी करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. नव्यानं तयार होत असलेल्या सामाजिक सुरक्षा कायद्यामध्ये याचा समावेश केला जाऊ शकतो. लेबर मार्केटच्या तज्ज्ञांनुसार, ग्रॅच्युईटीसाठी पाच वर्षांची मर्यादा खूपच अधिक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचं हित पूर्ण केलं जाऊ शकत नाही.

दरम्यान, दीर्घकाळ कामाच्या पद्धतीला प्रोत्साहन दिलं जावं याकरीता ग्रॅच्युईटीसाठी ५ वर्षांची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता विविध नोकऱ्यांचे पर्याय खुले झाले आहेत, त्याचबरोबर नोकऱ्यांमधील असुरक्षितता देखील वाढत आहे.

त्यामुळे कर्मचारी आपली प्रगती आणि भविष्य पाहता पाच वर्षे एकाच संस्थेत नोकरी करत नाहीत. त्यामुळे ग्रॅच्युईटीसाठीची पाच वर्षांची मर्यादा त्यांच्यासाठी फायद्याची नाही.

स्थायी समितीने ग्रॅच्युईटीची मर्यादा एक ते तीन वर्षांसाठी निश्चित करण्याचा पर्याय दिला आहे. त्याशिवाय कामाच्या स्वरुपानुसार याची मर्यादा वेगवेगळी निश्चित केली जाऊ शकते.

परंतू श्रम मंत्रालयाकडून यासंबंधी अजून कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. ग्रॅच्युईटीनुसार, कर्मचारी जितकी वर्ष एकाच संस्थेत काम करतो तितक्या वर्षांसाठी प्रत्येक महिन्यातील १५ दिवसांचा पगार त्यांला ग्रॅच्युईटी म्हणून दिला जातो.

नक्की वाचा >>
देशातील पहिली किसान रेल्वे, शेतकऱ्यांना होणार फायदा
बिग बॉस मुळे रातोरात पालटलं शहनाज गिलचं नशीब
मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Central Vista Project चा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने केला मोकळा

Web News Wala

अग्रणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला राष्ट्रीय जल पुरस्कार

Team webnewswala

राजस्थानमध्ये दिवाळी फटाक्यांविनाच होणार साजरी

Team webnewswala

1 comment

18 कोटी लोकांचे PAN कार्ड होऊ शकते रद्द - Web News Wala August 15, 2020 at 7:04 pm

[…] ( हे वाचा – लवकरच बदलु शकतात ग्रॅच्युईटीचे नियम ) […]

Reply

Leave a Reply