Other आरोग्य शहर

करोनाबाधित पोलिसांची संख्या१० हजारांच्या घरात

करोना योद्धे असलेल्या पोलिसांना देखील करोनाचा झपाट्याने संसर्ग होताना दिसत आहे. राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १० हजाराच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे.

देशभरासह राज्यात करोनाचा संसर्ग अधिकच वेगाने वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आता करोना योद्धे असलेल्या पोलिसांना देखील करोनाचा झपाट्याने संसर्ग होताना दिसत आहे. राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १० हजाराच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे.

मागील चोवीस तासांत राज्यभरात २३२ नवे करोनाबाधित पोलीस आढळले असून, एका पोलिसाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, याचबरोबर राज्यातील करोनबाधित पोलिसांची संख्या ९ हजार ४४९ वर पोहचली आहे. यामध्ये ९७१ अधिकारी व ८ हजार ४७८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

the-number-of-police-in-the-state-is-close-to-10000

सद्यस्थितीस २१९ अधिकारी व १७१३ कर्मचारी मिळून १ हजार ९३२ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तर, ७४३ अधिकारी व ६६७१ कर्मचारी मिळून एकूण ७ हजार ४१४ पोलीस आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत.

आतापर्यंत १०३ पोलिसांचा मृत्यू झालेला असून, यामध्ये ९ अधिकारी व ९४ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

the-number-of-police-in-the-state-is-close-to-10000

संपूर्ण देशभर करोना रुग्णांची संख्या चिंताजनक वेगाने वाढत असून मागील चोवीस तासांत ५५ हजार ७८ लोकांना संसर्ग झाला, तर ७७९ रुग्ण दगावले. तर महाराष्ट्रात १०,३२० रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील  करोनाबाधितांची संख्या १६ लाख ३८ हजार ८७० वर पोहोचली आहे.

चोवीस तासांमध्ये ३७ हजार २२३ रुग्ण करोनामुक्त झाले असून ५ लाख ४५ हजार ३१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी उच्चस्तरीय मंत्रिगटाच्या १९व्या बैठकीत दिली. केंद्र सरकारने पुणे, ठाणे, बेंगळूरु, हैदराबाद अशा करोनाग्रस्त शहरांवर लक्ष केंद्रित केले आहे.

हे ही वाचा 
डोंगरी-माझगाव ला जोडणाऱ्या हॅकॉक पुलाच काम अंतिम टप्यात 
तंबाखूपासून कोरोना प्रतिबंधक लस, लवकरच होणार मानवी ट्रायल 

बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

भिवंडी दुर्घटना मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

Team webnewswala

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मंजुरी

Team webnewswala

Kia Motors बहुचर्चित Kia Sonet कॉम्पक्ट एसयूव्ही लाँच

Team webnewswala

2 comments

रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदचे एअरलिफ्ट - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:27 am

[…] राज्यातील करोनाबाधित पोलिस १० हजारां… […]

Reply
एकनाथ खडसेंना महावितरणने दिला वाढीव वीज बिलाचा ‘शॉक’ - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:28 am

[…] राज्यातील करोनाबाधित पोलिस १० हजारां… […]

Reply

Leave a Reply