Team WebNewsWala
आरोग्य शहर

मुंबईत आज बरे होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा 9 पटीने अधिक

आरोग्य सेवकांसाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. कोरोनामुळं सेवकाचा मृत्यू झाल्यास 48 तासात 50 लाख मिळणार विम्याचा क्लेम मंजूर

मुंबईत आज बरे होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा 9 पटीने अधिक 

Webnewswala Online Team – महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असतानाच आता महाराष्ट्रातील हाताबाहेर गेलेली कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र दिसून येत आहे. मुंबईत आज बरे होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा 9 पटीने अधिक मुंबईत कोरोनाने पहिल्यापासुनच मोठ्या प्रमाणात हातपाय पसरले होते, पण आता मुंबईतील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस सुधारत असल्याचं आणि मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असल्याचं पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया आजची दिलासादायक आकडेवारी.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 24 तासात एकूण 676 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात 5 हजार 570 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आजची आकडेवारी ही मोठ्या प्रमाणात दिलासादायक असल्याचं चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 22 हजार 390 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 94 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 6 लाख 66 हजार 796 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत.

रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत होता, आता तो विश्वास खरा होत असताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने कमी होत असल्याचं दिसून येत आहे. मागच्या काही दिवसात कोरोना रूग्णसंख्या कमी होत असल्याने लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होत असताना पाहायला मिळत आहे.

Web Title – मुंबईत आज बरे होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा 9 पटीने अधिक ( The number of people recovering in Mumbai today is 9 times more than the number of victims )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

Corona Vaccine ‘या’ देशात लहान मुलांचे लसीकरण सुरू

Web News Wala

विद्यापीठाची प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू

Team webnewswala

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ना भारतरत्न द्या, शिवसैनिकानं लिहिलं रक्तानं पत्र

Team webnewswala

Leave a Reply