Team WebNewsWala
आरोग्य राष्ट्रीय

दुसरी लाट आटोक्यात दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा कमी

Corona virus हा नाक, जिभेप्रमाणे कानांवरही गंभीर दुष्परिणाम करत असल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये बहिरेपणाचं लक्षण

दुसरी लाट आटोक्यात दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा कमी

Webnewswala Online Team – देशात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येताना दिसत आहे. देशात (Coronavirus in India) कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. गेल्या 24 तासात देशात एक लाखांहून थोडे अधिक नवे रुग्ण आढळून आले. तर 2427 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतला आहे. रविवारी दिवसभरात 1 लाख 74 हजार 399 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर 61 दिवसांनंतर रविवारी एवढे कमी नवे रुग्ण देशात आढळून आलेत.

Covid-19 Latest Updates Today

1,00,636 – गेल्या 24 तासात एकूण नवीन रुग्ण

1,74,399 – गेल्या 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण

2427 – गेल्या 24 तासात एकूण मृत्यू

2,89,09,975 – देशात संसर्ग झालेल्या कोरोनाची एकूण संख्या

2,71,59,180 – देशात आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या

3,49,186 – देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या

आता भारतात कोरोनाची एकूण अॅक्टिव्ह रुग्ण- 14,01,609

एकूण लसीकरण – 23,27,86,482

वरील आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) सोमवारी (07 जून 2021) सकाळी 8 वाजता जाहीर केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 1,00,636 नवीन (New Corona Case) कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 2427 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. त्याच बरोबर, गेल्या एका दिवसात 1,74,399 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोना रूग्णांचा आलेख झपाट्याने कमी होताना दिसत आहे. देशभरात आता कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ 14 लाख आहे.

देशात लसीकरण जोरात

देशात आतापर्यंत 23 कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण झालं आहे. 23,27,86,482 लोकांना लस देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यापैकी रविवारी 13,90,916 लोकांचं लसीकरण झालं. ICMR नुसार, रविवारी देशात 15,87,589 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर देशात आतापर्यंत 36,63,34,111 लोकांची कोरोना चाचणी झाली आहे.

Web Title – दुसरी लाट आटोक्यात दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा कमी ( The number of patients in the second wave is decreasing day by day )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

‘कोरोनिल’ वरुन बाबा रामदेव अडचणीत कोर्टानं बजावले समन्स

Web News Wala

राज्यसभेमध्ये बँक नियमन विधेयक मंजूर

Team webnewswala

रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सोनू सूद चे एअरलिफ्ट

Team webnewswala

Leave a Reply