Other आरोग्य पर्यावरण व्यापार शहर

देशातील सर्वात महागडी भाजी किंमत प्रति किलो हजारोच्या घरात

या भाजीला झारखंडमध्ये खुखडी, तर छत्तीसगड या भाजीला रुगडा म्हटले जाते. देशातील सर्वात महागडी भाजी हजारोच्या घरात झारखंडमध्ये ही भाजी विकली जाते.

आजवर आपण जास्तीत जास्त १०० रुपये प्रतिकिलो पाहिली किंवा खाल्ली असेल, त्यातच तुम्हाला कोणी देशातील सर्वात महागडी भाजी कोणती असा प्रश्न विचारला, तर तुम्ही नक्कीच विचारात पडाल.

पण आपल्या देशातील दोनच राज्यात ही सर्वात महागडी भाजी विकली जाते आणि भाजी फक्त श्रावण महिन्यातच उपलब्ध होते. ही भाजी झारखंड आणि छत्तीसगड या दोन राज्यात विकली जाते.

या भाजीची चिकन आणि मटनापेक्षा जास्त किंमत असून या भाजीला झारखंडमध्ये खुखडी, तर छत्तीसगड या भाजीला रुगडा म्हटले जाते. देशातील सर्वात महागडी भाजी किंमत प्रति किलो हजारोच्या घरात झारखंडमध्ये ही भाजी विकली जाते.

ही भाजी बाजारात आल्यानंतर तिची झटपट विक्री होते. या भाजीमध्ये सर्वाधिक प्रथिने आहेत. मशरूम भाजीचीच खुखडी आणि रुगडा या भाज्या एक प्रजाती आहे. जंगलात नैसर्गिकरित्या ही भाजी वाढते. ही भाजी दोन दिवसांत शिजवावी लागते. त्यापेक्षा जास्त वेळ लावल्यास ती खराब होते.

पावसाळ्याच्या दिवसात ही भाजी छत्तीसगडमधील बलरामपूर, सूरजपूर, सुरगुजा, छत्तीसगडसह उदयपूरला लागून कोरबा जिल्ह्यातील जंगलात आढळते. या भाजीची मागणी पाहून जंगलात राहणारे ग्रामीण भागातील लोक या भाजीला जमा करुन ठेवतात. छत्तीसगढमधील अंबिकापूरसह इतर शहरी भागातील लोक याला कमी किमंतीत विकत घेऊन १००० ते १२०० रुपये किलो दराने विकतात.

श्रावण महिन्यात दिवसला अंबिकापुर बाजारात पाच क्विंटलपेक्षा जास्त खुखडी मिळते.

दोन महिन्यांपर्यंत वाढणाऱ्या खुखडीची मागणी एवढी वाढते की जंगलात राहणारे ग्रामस्थ ते साठवून ठेवतात. ही भाजी कमी किंमतीत विकत घेऊन ती छत्तीसगडमधील अंबिकापूरसह इतर शहरी भागात १००० ते १२०० रुपयांपर्यंत प्रतिकिलो विकतात.

अंबिकापूर बाजारात या हंगामात दररोज सुमारे पाच क्विंटल या भाजीचा पुरवठा होतो. खुखडी हा पांढर्‍या मशरूमचा एक प्रकार आहे. खुखडीच्या अनेक प्रजाती व वाण आहेत. लांब पट्ट्यातील सोरवा खुखडीला जास्त पसंती असते.

भूडू खुखडी असे त्याला म्हणतात. मातीचे घर किंवा टेकडी हे भुडूचे उगम स्थान असून जिथे ही भाजी पावसात वाढते. ही भाजी शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरते.

झारखंड आणि छत्तीसगढमधील लोक श्रावण महिन्यात चिकन आणि मटण खाणे बंद करतात.

अशा परिस्थितीत दुर्गम भागातून मिळणाऱ्या खुखडी या भाजीची मागणी वाढते, कारण हा चिकन आणि मटणाला पर्याय चांगला मानला जातो. ही भाजी रांचीमध्ये प्रतिकिलो ७०० ते ८०० रुपये दराने विकली जाते.

खुखडीची चांगली पारख गुरेढोरे पाळणाऱ्या मेंढपाळ करतात. त्याचबरोबर त्यांना खुखडी कोठे सापडेल हेदेखील ठाऊक असते. भाजीशिवाय औषधे बनवतानाही याचा उपयोग होतो. पावसाळ्यामध्ये वीज कोसळल्याने जमिनीच्या आतून पांढऱ्या रंगाची खोखडी बाहेर येते, असे सांगितले जाते.

नक्की वाचा >>
देशातील पहिली किसान रेल्वे, शेतकऱ्यांना होणार फायदा
१५ ऑगस्ट रोजी ठाण्यात रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री
मॉरिशस तेल गळती; जपानी जहाजाचे झाले दोन तुकडे

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

रक्षाबंधनच्या मुहूर्तावर अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाची घोषणा

Team webnewswala

सूर्याचा ‘रोहिणी’ प्रवेश तापमान वाढण्याची चिन्हे

Web News Wala

10 कोटी स्मार्टफोन आणत Jio करणार फोन मार्केटवर कब्जा

Team webnewswala

Leave a Reply