Team WebNewsWala
Other मनोरंजन

ऑक्टोबर महिन्यापासून झी वाजवा वाहिनीची सुरूवात

झी’ने एका नवीन मराठी संगीत वाहिनीची घोषणा केली. ‘झी वाजवा’ असं या वाहिनीचं नाव आहे. ‘झी वाजवा, क्षण वाजवा’ असं या वाहिनीचं ब्रीदवाक्य आहे.

झी मराठी वाहिनीवरील प्रतिष्ठित झी गौरव पुरस्कार २०२० मध्ये ‘झी’ने एका नवीन मराठी संगीत वाहिनीची घोषणा केली. ‘झी वाजवा’ असं या वाहिनीचं नाव आहे. ‘झी वाजवा, क्षण वाजवा’ असं या वाहिनीचं ब्रीदवाक्य आहे. या नवीन वाहिनीच्या लोगोचे अनावरण अभिनेता स्वप्निल जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

अतिशय जल्लोषात आणि सांगितिक माहौलमध्ये या वाहिनीच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं. ‘झी वाजवा, क्षण वाजवा’ असं या वाहिनीचं ब्रीदवाक्य आहे. प्रेक्षकांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगण्यासाठी प्रेरणा देण्याचा या वाहिनीचा उद्देश आहे.

झी वाजवा वाहिनीच्या प्रक्षेपण निमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांनी या वाहिनीला अनेक शुभेच्छा दिल्या.

झी’ने एका नवीन मराठी संगीत वाहिनीची घोषणा केली. ‘झी वाजवा’ असं या वाहिनीचं नाव आहे. ‘झी वाजवा, क्षण वाजवा’ असं या वाहिनीचं ब्रीदवाक्य आहे.

‘झी वाजवा’ वाहिनीची सुरूवात या ऑक्टोबर महिन्यापासून होणार आहे.

झी वाजवा या वाहिनीच्या निमित्ताने मराठी गाण्यांसोबतच मराठी निर्मात्यांना,  दिग्दर्शकांना आणि मराठी चित्रपटांना एक हक्काचं व्यासपीठ मिळेल याचं मराठी चित्रपटसृष्टीचा एक भाग म्हणून खूप आनंद आणि अभिमान वाटत असल्याची भावना स्वप्नील जोशीने व्यक्त केली. तसेच वाहिनीवर सादर होणाऱ्या गाण्यांमुळे मराठी गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्यासाठी झी एक नवीन व्यासपीठ उलब्ध करून देतंय यासाठी सिद्धार्थ जाधव याने मनापासून ‘झी’ समूहाचं अभिनंदन केलं.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

देशात मुंबईकरांना मिळते सर्वात शुद्ध पाणी

Team webnewswala

शुभमंगल ऑनलाईन ने गाठला १०० भागांचा टप्पा

Web News Wala

रिलायन्सची थ्रीडी जिओ ग्लास ची व्हर्च्युअल क्लासरूम

Team webnewswala

Leave a Reply