Team WebNewsWala
शहर

कोपरी रेल्वे पूल मार्चअखेरीस खुला

कोपरी रेल्वे पुल लोखंडी तुळई बसवून पूर्ण झाल्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस चार अतिरिक्त मार्गिका उपलब्ध होणार

ठाणे : कोपरी रेल्वे पुल लोखंडी तुळई बसवून पूर्ण झाल्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस या पुलावर बांधण्यात आलेल्या नव्या चार अतिरिक्त मार्गिका मुंबईत ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना उपलब्ध होणार आहेत. संपूर्ण आठ पदरी पुलासाठी वाहनचालकांना एक ते दीड वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, नव्या चार मार्गिका खुल्या झाल्या, तरी वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आठ पदरी मार्गासाठी मात्र दीड वर्षाची प्रतीक्षा

वाहनांच्या वाढत्या वर्दळीपुढे अपुरा पडत असलेल्या कोपरी पुल आठ पदरीकरणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्याचा भाग म्हणून रेल्वे प्रशासन आणि एमएमआरडीएने या ठिकाणी तुळया उभारल्या आहेत. त्यामुळे आता या ठिकाणी या तुळयांवर आता डांबरीकरण करून अतिरिक्त मार्गिका तयार करणे शक्य होणार आहे. या अतिरिक्त मार्गिकांचे काम येत्या मार्चपर्यंत डांबरीकरण करून पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर या अतिरिक्त मार्गिका  वाहतुकीसाठी खुल्या होणार आहेत. असे असले तरी कोपरी पुलाचे प्रत्यक्ष काम करण्यासाठी अद्यापही वर्ष लागणार आहे.

आता तीन हात नाक्याचा धोका

कोपरी पुलाच्या आठ पदरीकरणानंतर  वाहतुकीचा भार तीन हात नाका जंक्शनवर येण्याची भीती वाहतूक पोलिसांनी महापालिकेकडे व्यक्त केली आहे. पूर्व दु्तगती महामार्गावर ठाण्याकडे ये-जा करताना यापूर्वी कोपरी पूल हा मोठा अडथळा ठरत असे. नव्या मार्गिकांमुळे येथील प्रवास काहीसा सुखकर होणार असला तरी भरधाव वाहनांचा भार आता तीन हात नाका पूल आणि खालील बाजूस येण्याची शक्यता आहे. ही मार्गिका मेट्रोच्या कामामुळे आधीच निमुळती झाली आहे. तसेच उड्डाणपुलावर जाणारा मार्गही अडथळ्याचा आहे. त्यामुळे या ठिकाणी कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना तातडीने हाती घेण्यात याव्यात, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

कामाचे स्वरूप

पूर्वी असलेल्या पुलापेक्षा या पुलाची उंची आणखी वर वाढविण्यात आली आहे. अतिरिक्त मार्गिका तयार झाल्या असल्या तरी जुन्या पुलाची उंची वाढविण्याचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. अतिरिक्त मार्गिका झाल्यास जुन्या पुलाची वाहतूक अतिरिक्त मार्गिकांवर वळविण्यात येणार आहे. त्यानंतर जुन्या पुलाची उंची वाढविण्याचे काम सुरू होणार आहे. जुन्या पुलाचे काम पूर्ण झाल्यास एकूण आठ मार्गिका तयार होणार असल्याची माहिती रेल्व अधिकाऱ्याने दिली.

तुळया बसविल्यामुळे चार अतिरिक्त मार्गिका तयार होणार आहे. त्यांचे काम मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक नव्या मार्गिकांवरून करता येईल.

– बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मुंबईत येणार चालक विरहित मेट्रो

Web News Wala

डोंबिवली चिमणी प्रेमीचे `चिमणी बचाव` जनजागृतीसाठी प्रयत्न… 

Team webnewswala

कर्नाटक सरकारला शिवरायांचे वावडे हटवला महाराजांचा पुतळा

Team webnewswala

Leave a Reply