Team WebNewsWala
क्रीडा

IPL मुळे टेस्ट चॅम्पियनशिप पुढे ढकलली 

IPL 2021 स्थगित झाल्यामुळे चाहत्यांना संपूर्ण मे महिन्यात क्रिकेटचा आनंद घेता आला नाही, जून महिना मात्र Cricket रसिकांसाठी ब्लॉकबस्टर ठरणार
IPL मुळे टेस्ट चॅम्पियनशिप पुढे ढकलली 

मुंबई : भारतात २०२१ची आयपीएल स्पर्धा होणार आहे. या IPL मुळे होणारा तारखांचा घोळ टाळण्यासाठी आयसीसीने जागतिक कसोटी क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धा अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पुढे ढकलली. आधी टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना १० ते १४ जून २०२१ या कालावधीत होणार होता. आता अंतिम सामना १८ ते २२ जून २०२१ या कालावधीत खेळला जाईल. (ICC World Test Championship final postponed, revised date announced)

आयपीएल ही क्रिकेट विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय टी-ट्वेंटी लीग स्पर्धा आहे. दरवर्षी जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीत आयपीएलचे आयोजन भारतामध्ये होते. मागच्यावर्षी कोरोना संकटामुळे बीसीसीआयने संयुक्त अरब आमिराती येथे आयपीएलचे आयोजन केले. यंदा भारतातच एप्रिल-मे २०२१ दरम्यान आयपीएलचे आयोजन होण्याची शक्यता आहे. स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. मात्र आयपीएलच्या तारखांचा अंदाज आल्यामुळे आयसीसीने जागतिक कसोटी क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धा अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पुढे ढकलली आहे.

फेब्रुवारी-मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळणार

आयपीएल झाल्यानंतर टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी अनेक खेळाडूंना भारतातून इंग्लंडमध्ये लंडन येथे दाखल व्हायचे आहे. अंतिम सामना लॉर्ड्सवर होणार आहे. या सामन्याआधी कोविड प्रोटोकॉलमुळे खेळाडूंना १४ दिवस हॉटेलच्या रूमवर क्वारंटाइन व्हावे लागेल. या नियमाचे भान ठेवून १० ते १४ जून ऐवजी अंतिम सामना १८ ते २२ जून २०२१ या कालावधीत खेळला जाईल.

सध्याच्या स्थितीत भारत टेस्ट चॅम्पियनशिपच्या तालिकेत पहिल्या स्थानावर आहे. या तालिकेत सामने जिंकण्याच्या टक्केवारी स्वरुपातील प्रमाणाला महत्त्व आहे. टेस्ट चॅम्पियनशिपच्या उर्वरित मालिकांचा विचार केल्यास भारताची स्थिती प्रबळ दिसते.

भारत मायदेशात इंग्लंड विरुद्ध एक कसोटी मालिका खेळणार आहे. फॉर्मात असलेला भारतीय संघ ही मालिका जिंकण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारताच्या खेळाडूंना इंग्लंडमध्ये दाखल व्हावे लागेल. याच कारणामुळे आयपीएलच्या आयोजनाचा अंदाज येताच आयसीसीने जागतिक कसोटी क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धा अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पुढे ढकलली आहे.

भारत टेस्ट चॅम्पियनशिपच्या तालिकेत पहिल्या स्थानावर

ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यामुळे भारत टेस्ट चॅम्पियनशिपच्या तालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. भारताची जिंकण्याची टक्केवारी ७१.७ टक्के आहे. टेस्ट चॅम्पियनशिपच्या तालिकेत दुसऱ्या स्थानावर ७० टक्के जिंकण्याच्या प्रमाणासह न्यूझीलंड विराजमान आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका जूनच्या सुरुवातीला होणार आहे. या मालिकेनंतर टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे.

ऑस्ट्रेलिया तालिकेत ६९.२ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांची आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका आहे. तर इंग्लंड ६८.७ टक्क्यांसह तालिकेत चौथ्या स्थानावर आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

IPL 14 साठी १८ किंवा १९ फेब्रुवारीला लिलाव

Web News Wala

ओमान ची T 20 World Cup आयोजनाची तयारी

Web News Wala

अनिल कुंबळेचा विक्रम धोक्यात, ‘या’ गोलंदाजाला रेकॉर्डसाठी 6 विकेट्सची गरज

Web News Wala

Leave a Reply