Team WebNewsWala
Other राजकारण राष्ट्रीय समाजकारण

राज्यपालांनी लॉकडाउनमध्ये लिहिली १३ पुस्तके

The governor wrote 13 books in the lockdown

मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी लॉकडाउनच्या कालावधीमध्ये चक्क १३ पुस्तके लिहून काढली आहेत. करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये पिल्लई यांनी पुस्तके आणि कविता लिहिल्या आहेत. मार्च महिन्यापासून आतापर्यंत राज्यपालांनी लॉकडाउनमध्ये लिहिली १३ पुस्तके

यामध्ये इंग्रजी आणि मल्याळम भाषेतील कविता संग्रहाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे राजभवनामध्ये कुणी येत नसल्याने आपल्याला वेळच वेळ मिळाला आणि त्यामुळे आपण ही पुस्तकं लिहू शकतो असंही राज्यपाल म्हणाले आहेत.

पिल्लई यांनी ‘पीटीआय’शी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे मला पुस्तके वाचवण्यासाठी आणि लिहिण्यासाठी भरपूर वेळ मिळाला असं पिल्लई यांनी म्हटलं आहे.

“राजभवनामध्ये कोणालाही येण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. लोकांबरोबर माझा संवादही बंद होता. तसेच निर्बंधांमुळे नियोजित दौरेही स्थगित करण्यात आले होते. त्यामुळेच मला वाचनासाठी आणि लिखाण करण्यासाठी खूप वेळ मिळाला,”

पी. एस. श्रीधरन पिल्लई

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये नियोजित काम केल्यानंतर जास्तीत जास्त वेळ आपण वाचन आणि लिखाणासाठी दिल्याचे पिल्लाई यांनी सांगितले. “मी सकाळी चार वाजता उठाचो. व्यायाम केल्यानंतर वाचन आणि लेखन सुरु करायचो,” असं पिल्लाई सांगतात. लोकांना अधिक शिक्षित बनवण्यासाठी नेत्यांनी आणि वरिष्ठ कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचली पाहिजेत असं मत पिल्लाई यांनी व्यक्त केलं आहे.

पिल्लई हे मागील तीन दशकांपासून लिखाण करत आहेत. त्यांचे पहिले पुस्तक १९८३ मध्ये प्रकाशित झालं होतं. राज्यपाल पदावर नियुक्त होण्याआदी त्यांची १०५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी आतापर्यंत एकूण १२१ पुस्तके लिहिली आहेत.

नक्की वाचा >>
देशातील पहिली किसान रेल्वे, शेतकऱ्यांना होणार फायदा
डोंगरी-माझगाव ला जोडणाऱ्या हॅकॉक पुलाच काम अंतिम टप्यात
मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

अकरावीची प्रवेश प्रक्रिया मार्गी लावण्याच्या हालचाली

Team webnewswala

Jio आणि Airtel मध्ये करार, JIo ग्राहकांना होणार फायदा

Web News Wala

मम्मीज बचत गट जागतिक कृषी महोत्सवाचा शुभारंभ

Web News Wala

Leave a Reply