Team WebNewsWala
शहर शिक्षण

विद्यापीठाची प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू

एमपीएससी ( MPSC ) कडून १३ सप्टेंबरला होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता २० सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे. MPSC कडून जाहीर.

बारावी निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थाना प्रथम विद्यापीठाकडे प्रवेश पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यापीठाची प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ही नोंदणी १८ जुलैपासून सुरू झाली असून ४ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ही नोंदणी करता येणार आहे.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षांसाठी प्रवेश घेण्यासाठी प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू  झाली असून विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. पहिली प्रवेश यादी ४ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.

पहिली गुणवत्ता यादी ४ ऑगस्ट रोजी

पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थाचे प्रवेश निश्चित करण्यासाठी शहरी भागातील महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया राबवावी लागणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्य़ातील महाविद्यालयांमध्ये ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. अंतर आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया राबवायची आहे. विद्यापीठाने यावर्षी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

प्रवेशाचे वेळापत्रक
  • अर्ज विक्री – २४ जुलै ते ४ ऑगस्ट
  • प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – २२ जुलै ते ४ ऑगस्ट  (दु.१ पर्यंत)
  • प्रवेश अर्ज सादर करणे –  २७ जुलै ते ४ ऑगस्ट, (३ वाजेपर्यंत)
  • पहिली गुणवत्ता यादी – ४ ऑगस्ट ( सायंकाळी ७.०० वाजता)
  • कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – ५ ते १० ऑगस्ट, (दु ३ पर्यंत)
  • दुसरी गुणवत्ता यादी – १० ऑगस्ट (७ वाजता)
  • कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – ११ ते १७ ऑगस्ट (दुपारी ३ वाजेपर्यंत)
  • तिसरी गुणवत्ता यादी —  १७ ऑगस्ट (७ वाजता)
  • कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – १८ ते २१ ऑगस्ट
५६ हजार विद्यार्थाचे अर्ज

मुंबई विद्यापीठाने १८ जुलैपासून प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी सुरू केली आहे. आतापर्यंत ६७ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर विविध अभ्यासक्रमांसाठी ५६ हजार १२९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. नोंदणी करताना काही अडचणी आल्यास विद्यार्थाना ०२२-६६८३४८२१  या मदतवाहिनीवर संपर्क साधता येणार आहे. ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील (click on—Mumbai University Pre Admission online Registration २०२०—२१) या  लिंकवर क्लिक करावे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन

Web News Wala

राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा MPSC चा निर्णय

Team webnewswala

मुंबई १५ जून पर्यंत लॉकडाऊनचे नियम जाहीर

Web News Wala

Leave a Reply