Team WebNewsWala
शहर शिक्षण

मुंबई विद्यापीठाची परीक्षा १ ते १७ ऑक्टोबरदरम्यान

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा १ ते १७ ऑक्टोबरदरम्यान होणार असून प्रत्येक महाविद्यालय समूहाला त्यांचे वेळापत्रक तयार करता येणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा १ ते १७ ऑक्टोबरदरम्यान होणार असून प्रत्येक महाविद्यालय समूहाला त्यांचे वेळापत्रक तयार करता येणार आहे.

प्रश्नपत्रिकाही महाविद्यालयांचे समूह काढणार असून त्या बहुपर्यायी असतील. एका तासाच्या कालावधीत ५० गुणांचे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे असून परीक्षेपूर्वी सराव प्रश्नही देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे परीक्षा १३ मार्चपर्यंत शिकवून झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत अखेर मुंबई विद्यापीठाने नियमावली जाहीर

विद्यापीठात पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांच्या परीक्षा महाविद्यालयांवरच लादण्यात आल्या आहेत. यंदा अंतिम वर्षांच्या परीक्षांची जबाबदारीही विद्यापीठाने महाविद्यालयांवर ढकलली आहे. परीक्षा आणि शैक्षणिक कामकाजाच्या सुसूत्रतेसाठी विद्यापीठाने यापूर्वीच अव्यावसायिक महाविद्यालयांचे समूह केले होते.

त्या माध्यमातून महाविद्यालयांनी परीक्षा घ्यायच्या आहेत. या परीक्षेसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांचेही समूह विद्यापीठाने तयार केले आहेत. समूहातील प्रमुख महाविद्यालयाने परीक्षांची जबाबदारी घ्यायची आहे. प्रत्येक महाविद्यालयाच्या समूहाने प्रश्नसंच तयार करून विद्यार्थ्यांची बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात परीक्षा घ्यायची आहे.

यंदा अंतिम वर्षांच्या परीक्षांची जबाबदारी महाविद्यालयांवर

एका तासाच्या कालावधीत ५० गुणांचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. बदललेल्या परीक्षा पद्धतीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून सराव चाचणीही घेण्याची सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिली आहे. एखादा विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देऊ शकत नसल्यास त्याची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

कोपरी पुल कामासाठी मध्य रेल्वेवर रात्रीचे विशेष ब्लॉक

Web News Wala

परदेशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु

Web News Wala

देशात मुंबईकरांना मिळते सर्वात शुद्ध पाणी

Team webnewswala

Leave a Reply