क्रीडा

Pro Kabaddi League चा आठवा हंगाम लांबणीवर

करोनाच्या साथीमुळे Pro Kabaddi League चा आठवा हंगाम लांबणीवर पडला आहे. ही लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे,

करोनाच्या साथीमुळे Pro Kabaddi League चा आठवा हंगाम लांबणीवर पडला आहे. दरवर्षी जुलै ते सप्टेंबरदरम्यान होणारी ही लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे, असे संयोजकांकडून शनिवारी स्पष्ट करण्यात आले आहे. करोनाच्या पाश्र्वभूमीवर यंदा सर्वच स्पर्धाचे वेळापत्रक कोलमडले आहे. संपर्काच्या क्रीडा प्रकारांना अद्याप परवानगी मिळाली नसल्याने प्रो कबड्डीने त्यांच्या जुलै ते सप्टेंबपर्यंतच्या नियोजित तारखा मागे टाकल्या आहेत.

जयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार दीपक निवास हुडा या निर्णयाचे स्वागत करताना म्हणाला, ‘‘खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय स्वागतार्ह आहे. कबड्डीरसिकही या निर्णयाच्या पाठीशी राहतील, अशी आशा आहे.’’

लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली

प्रो कबड्डीच्या अधिकृत ‘ट्विटर’ खात्यावर म्हटले आहे की, ‘‘करोनामुळे लागू करण्यात आलेली आरोग्यविषयक नियमावली आणि संपर्काच्या क्रीडा प्रकारांबाबत खेळाडूंच्या सुरक्षेबाबतचे धारण यांचा गांभीर्याने विचार करून आम्ही प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेत आहोत. याबाबत आम्ही चाहत्यांची दिलगिरी प्रकट करतो. पुन्हा खेळण्यायोग्य सुरक्षित वातावरण निर्माण झाल्यावर हंगामाचे निश्चित आयोजन करू.’’

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा दबदबा

Team webnewswala

कर्णधार मिताली राज चे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती चे संकेत

Web News Wala

सचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन ?

Web News Wala

Leave a Reply