Team WebNewsWala
Other आंतरराष्ट्रीय क्रीडा

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा दबदबा

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांनीही आपले पहिले आणि दुसरे स्थान अबाधित ठेवले आहे.

दुबई : आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांनीही आपले पहिले आणि दुसरे स्थान अबाधित ठेवले आहे. तर भारतीय गोलंदाज बुमराह गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

काल जारी करण्यात आलेल्या आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोहली 871 गुणांसह टॉपवर आहे. तर रोहित 855 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आजम हा 829 गुणांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

719 गुणांसह गोलंदाजांच्या यादीमध्ये जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर तर 722 गुणांसह न्यूझीलंडचा ट्रेंड बोल्ट पहिल्या स्थानावर आहे. 701 गुणांसह अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान तिसऱ्या स्थानावर आहे.

ऑलराउंडर खेळाडूंच्या टॉप 10 यादीत रविंद्र जडेजा

ऑलराउंडर खेळाडूंच्या यादीत टॉप 10 खेळाडूंच्या यादीत रविंद्र जडेजा एकमेव भारतीय खेळाडू असून तो आठव्या स्थानावर आहे. अफगानिस्तानचा मोहम्मद नबी या यादीत टॉपवर आहे. तर इंग्लंडचा बेन स्टोक्स दुसऱ्या स्थानावर आहे.

The dominance of Indian batsmen in the ICC ODI rankings

यादरम्यान, रॅकिंगच्या दृष्टिने इंग्लंडचा जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टोच्या कामगिरीवर नजर असणार आहे. आयसीसीच्या बहुचर्चित ODI Super League स्पर्धेला 30 जुलै पासून सुरुवात होणार आहे.

2023 साली भारतात होणाऱ्या स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी ही स्पर्धा प्रत्येक संघासाठी महत्वाची आहे. 4 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झालेली असली तरी डिसेंबर महिन्याखेरीस भारतीय क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मैदानात उतरताना दिसणार नसल्यामुळे आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना मैदानात पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांना थोडी वाट पहावी लागणार आहे.

आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

यवतमाळ जिल्ह्यातील हल्लेखोर वाघिणीला पकडण्यात यश

Team webnewswala

Netflix आणणार स्वस्त मस्त Mobile+ प्लान

Team webnewswala

मॉरिशस तेल गळती जपानी जहाजाचे झाले दोन तुकडे

Team webnewswala

Leave a Reply