Team WebNewsWala
Other

देशातील पहिली किसान रेल्वे, शेतकऱ्यांना होणार फायदा

भारतीय रेल्वेने एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. आज भारतीय रेल्वेमार्फत देशातील पहिली किसान रेल्वे गाडीची सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळही उपस्थित होते. या रेल्वेतून फळ आणि पाले-भाज्यासारख्या सामानाची ने आण करण्यात येणार आहे. जाणून घेऊयात ही भारतीय रेल्वेने एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. आज भारतीय रेल्वेमार्फत देशातील पहिली किसान रेल्वे गाडीची सुरुवात करण्यात आली आहे. देशातील पहिली किसान रेल्वे ट्रेन नेमकी काय आहे आणि याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार…
देशातील पहिली किसान रेल्वे, शेतकऱ्यांना होणार फायदा
कुठून कुठपर्यंत ?

किसान रेल्वे गाडी महाराष्ट्र ते बिहार या राज्यात धावणार आहे. महाराष्ट्रातील देवळाली स्थानकातून सकाळी ११ वाजता ही रेल्वे रवाना होणार आणि बिहारच्या दानापुर स्थानकापर्यंत जाणार आहे.

वैशिष्ट्ये काय?
किसान रेल्वे गाडीत रेफ्रिजरेटेड कोच लावण्यात आले आहेत. १७ टनपर्यंत माल वाहून नेहण्याची क्षमता या ट्रेनमध्ये आहे. याचं डिजायनही हटके आहे. कपूरथला येथील रेल्वे कारखान्यातून या रेल्वेच्या बोगी तयार करण्यात आल्या आहेत.

यामधील कंटेनर फ्रीजसारखे असतील. ही रेल्वे म्हणजेच चालते फिरते कोल्ड स्टोरेज असणार आहे. या रेल्वेगाडीत शेतकऱ्यांच्या पालेभाज्या, भळे, मासे, मांस आणि दूधासारख्या पदार्थांना ठेवण्यात येणार आहे.

नक्की वाचा >>  
तंबाखूपासून कोरोना प्रतिबंधक लस, लवकरच होणार मानवी ट्रायल
कात्रजच्या प्राणी संग्रहालयातील नंदिनी वाघिणीचा मृत्यू

वेळापत्रक काय?

महाराष्ट्र-बिहार या मार्गावर किसान रेल्वेगाडी आठवड्यातून एकदा धावेल. महाराष्ट्रातील नाशिकमधील देवळाली स्थानकातून सकाळी ११ वाजता रवाना होणार आहे. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.४६ वाजता पटनाजवळील दानापुर स्थानकात पोहचेल. या रेल्वेगाडीला महाराष्ट्रातून बिहारमध्ये पोहचण्यासाठी ३२ तासांचा कालवधी लागणार आहे.

कोणत्या स्थानकावर थांबणार? –

देवळाली ते दानापुर या स्थानकादरम्यान एक हजार ५१९ किमी ट्रेन धावेल. देवळाली स्थानकातून निघाल्यानंतर नाशिक रोड, मनमाड, जळगांव, भुसावळ, बुरहानपुर, खंडवा, इटारसी, जबलपुर, सतना, कटनी, मणिकपुर, प्रयागराज, पं दीनदयाल उपाध्याय नगर आणि बक्सर या स्थानकावर थांबणार आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

भिवंडी दुर्घटना मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

Team webnewswala

Reliance Jio चा धमाका ५ नवे पोस्टपेड प्लॅन लाँच

Team webnewswala

Tik Tok वरील लोकप्रियता महागात, दोन वर्षांचा कारावास 14 लाखांचा दंड

Team webnewswala

26 comments

- Web News Wala August 15, 2020 at 5:02 pm

[…] […]

Reply

Leave a Reply