Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय आरोग्य

कोरोना पूर्णपणे नष्ट होणार नाही, नव्या संशोधनात खुलासा

कोरोना कधी एकदाचा संपतोय असा सवाल आता सर्वजण विचारत आहेत. कोरोना पूर्णपणे नष्ट होणार नाही. तो अनेक पिढ्यांपर्यंत आपल्यासोबत राहू शकतो असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

कोरोना पूर्णपणे नष्ट होणार नाही, नव्या संशोधनात खुलासा 

Webnewswala Online Team – कोरोना महामारीमुळे गेली 2 वर्ष सर्वांना घरात बसून रहावं लागत आहे. एवढंच नाही तर अनेकांनी आपल्या जवळचे लोक कोरोनाने गमावले आहेत. हा कोरोना कधी एकदाचा संपतोय असा सवाल आता सर्वजण विचारत आहेत. कोरोना पूर्णपणे नष्ट होणार नाही. तो अनेक पिढ्यांपर्यंत आपल्यासोबत राहू शकतो असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

जेव्हा एखादा संसर्ग समाजात येतो, तेव्हा तो हळूहळू पसरत जातो. त्यानंतर तो स्थानिक पातळीवर पसरत जातो. फ्लूचा संसर्ग अनेक पिढ्यांपासून आपल्यासोबत आहे. तसंच कोरोनाच्या बाबतीत होईल. कोरोना पूर्णपणे नष्ट होणार नाही. तो अनेक पिढ्यांपर्यंत आपल्यासोबत राहू शकतो, असं प्रा. डॉ. जी. व्ही. एस. मूर्ती यांनी सांगितलं आहे.

पुढची लाट येण्यास पाच ते सहा महिने लागू शकतात

उत्तर आणि पूर्व भारतातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होण्यासाठी जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत वाट पाहावी लागेल, असा अंदाज आहे. या महासाथी दरम्यान राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्याची घाई करणं हे कोरोना विषाणूची दुसऱ्या लाट वेगाने पसरण्याचं एक कारण ठरलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोनाची पुढची लाट येण्यास पाच ते सहा महिने लागू शकतात. तोपर्यंत लोकांच्या शरीरात तयार झालेली प्रतिकारशक्ती संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे नोव्हेंबरच्या दरम्यान पुन्हा काळजीची स्थिती उद्भवू शकते, असं देखील डाॅ. मुर्ती यांनी सांगितलं आहे.

Web Title – कोरोना पूर्णपणे नष्ट होणार नाही, नव्या संशोधनात खुलासा ( The corona will not be completely destroyed, new research reveals )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

एसटी आगारातील उपहारगृहाना नाथजल विकण्याची सक्ती

Team webnewswala

भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला

Web News Wala

नारळपाणी सेवनाने करा उन्हाळ्यातील आजारांपासुन बचाव

Web News Wala

Leave a Reply