Team WebNewsWala
आरोग्य राष्ट्रीय

Corona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस

Corona Vaccine देशाला चालू वर्षात मिळून करोनावरील लसींचे सुमारे 187 कोटी डोस उपलब्ध होऊ शकतील. त्यातून सर्व प्रौढांचे लसीकरण पूर्ण होण्याचा विश्‍वास

Corona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस

Webnewswala Online Team – देशाला चालू वर्षात मिळून करोनावरील लसींचे सुमारे 187 कोटी डोस उपलब्ध होऊ शकतील. त्यातून डिसेंबरच्या समाप्तीपर्यंत म्हणजेच चालू वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व प्रौढांचे लसीकरण पूर्ण होण्याचा विश्‍वास केंद्र सरकारला वाटत आहे.

देशाला अजूनही लसटंचाई जाणवत आहे. त्यामुळे वेगाने लसीकरण पूर्ण होण्याबाबत साशंकता व्यक्‍त केली जात आहे. मात्र, सरकारी सूत्रांनी देशातील 94 कोटी प्रौढांचे लसीकरण चालू वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची ग्वाही दिली आहे.

जानेवारी ते जुलै या कालावधीत 53 कोटीं डोस

जानेवारी ते जुलै या कालावधीत देशाला उपलब्ध होणाऱ्या लसींच्या डोसची संख्या 53 कोटींवर पोहोचेल. देशाला लस पुरवणाऱ्या कंपन्यांनी उत्पादन क्षमता वाढवली आहे. आणखी काही कंपन्यांकडून लस मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत 133 कोटी डोसची उपलब्धता होईल.

फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन या परदेशी कंपन्यांशी सरकारची चर्चा चालू आहे. त्यांच्याशी करार झाल्यास लस पुरवठा आणखी वाढेल, असे त्या सूत्रांनी नमूद केले.

Web Title – Corona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस ( The Corona Vaccine will be available in 187 crore doses this year )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

वाळूच्या टंचाईमुळे कोरोना लसीच्या वितरणाला ब्रेक लागण्याचा धोका

Web News Wala

4G डाउनलोड स्पीड Reliance Jio पुन्हा अव्वल

Team webnewswala

अग्रणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला राष्ट्रीय जल पुरस्कार

Team webnewswala

Leave a Reply