ऑटो शहर

शहरात लवकरच धावणार 100 डबलडेकर बस

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच १०० डबलडेकर बस ताफ्यात येणार आहेत. सध्या ताफ्यातील असलेल्या १२० डबलडेकर बस टप्प्याटप्यात भंगारात काढल्या जाणार आहेत.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच १०० डबलडेकर बस ताफ्यात येणार आहेत. सध्या ताफ्यातील असलेल्या १२० डबलडेकर बस टप्प्याटप्यात भंगारात काढल्या जाणार आहेत. त्या बदल्यात दाखल होणाऱ्या नवीन बससाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी बसमध्ये एकाऐवजी दोन दरवाजे, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचा समावेश असेल.

मुंबईत धावणाऱ्या दुमजली बस मुंबईकरांसह पर्यटकांच्याही पसंतीस पडल्या आहेत. सध्या १२० बस ताफ्यात असून दुमजली बसची स्वतंत्र ओळख आहे. त्यामुळे मुंबईतील ही बस नेहमीच चर्चेचा विषय ठरली. दुहेरी बसमुळे प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढली आणि त्यामुळेच या बसचा ताफा हळूहळू वाढवण्यात आला. परंतु सध्याच्या बस जुन्या झाल्याने त्या टप्प्याटप्यात भंगारात काढल्या जात आहे. दुहेरी बसची ओळख पुसली जाऊ नये आणि प्रवासी वाहून नेण्याची क्षमता कमी होऊ नये यासाठी भंगारात काढल्या जाणाऱ्या बसच्या बदल्यात १०० दुमजली बस घेण्याचा निर्णय झाला आणि त्याची निविदा मागविण्यात आली असून प्रत्यक्ष खरेदी होऊन बस ताफ्यात येण्यास काही महिने लागतील, अशी माहिती बेस्टमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मुंबईत दुमजली बस वगळता महाराष्ट्रातील अन्य परिवहन सेवांत अशा प्रकारच्या बस नाही.

बसची वैशिष्टय़े

भारत-६ श्रेणीतील बस आणि त्यात स्वयंचलित गिअर असतील.

बस थांब्याची माहिती देण्यासाठी बसमध्येच इलेक्ट्रॉनिक बोर्ड बसवण्यात येतील.

दोन स्वयंचलित दरवाजे. ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बस चालकाकडे.

बसमधील दोन वाहकांना परस्पर संपर्कासाठी विशेष व्यवस्था राहिल.

सीसीटीव्ही कॅमेरा असेल.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पर्यावरण पुरक गणेशोत्सव साठी Roatary Club Of Dombivali Midtown सज्ज

Team webnewswala

भिवंडी ग्रामीण भागात कोव्हिड लसीकरणाला सुरुवात…

Web News Wala

पावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका

Web News Wala

Leave a Reply