Team WebNewsWala
Other तंत्रज्ञान मनोरंजन

मनोरंजन क्रांतीचे उत्तम उदाहरण म्हणजे OTT

OTT Platform ला कोणताही सेन्सॉर नसल्यामुळे त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते. आक्षेपार्ह मजकूर देखील अशा OTT Platform वर

माझ्यासाठी तर मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट पाहणे हे करमणुकीचे उत्तम साधन होते. मी प्रत्येक शुक्रवारी एखादा नवीन चित्रपट प्रदर्शित होण्याची अपेक्षा करीत असे, प्रिमियर शोचे रिव्ह्यू मिळवायचे आणि त्यानुसार आपले मुव्ही टिकीट आधीच बुक करून ठेवायचे. मात्र लॉकडाउनमध्ये या सा-या मनोरंनात्मक गोष्टींना पूर्णविरामच मिळाला आणि घरी राहण्याचा एकमेव पर्याय शिल्लक राहिला. अनलॉकच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मात्र मी ‘ओव्हर द टॉप’ (OTT) सेवांकडे माझा मोर्चा वळवला.

अॅमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स, झी फाइव्ह, एमएक्स प्लेयर यांसारख्या ‘ओव्हर द टॉप’ (ओटीटी) सेवांच्या माध्यमातून नुकतेच प्रदर्शित झालेले काही चित्रपट या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येत आहेत. शिवाय काही नव्या वेब सीरिजही प्रदर्शित करण्यात आल्या असून मनोरंजनाकरिता मला ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करणे आवडू लागले आणि पाहता पाहता जणू यांचे व्यसनच जडले आणि मनोरंजनाची सारी कसरच या ओटीटी प्लॅटफॉर्मने भरून काढली.

ओटीटी सेवा देणारे एकूण ४० प्रोव्हायडर्स 

भारतात लॉकडाउनमध्ये या सा-या मनोरंनात्मक गोष्टींना पूर्णविरामच मिळाला आणि घरी राहण्याचा एकमेव पर्याय शिल्लक राहिला. अनलॉकच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मात्र मी ‘ओव्हर द टॉप’ (OTT) सेवांकडे माझा मोर्चा वळवला.सेवा देणारे एकूण ४० प्रोव्हायडर्स आहेत. २०१८ मध्ये त्यांची २१ दशकोटी रुपयांची व्याप्ती होती. ती २०१९ मध्ये वाढून ३५ दशकोटी रुपयांपर्यंत पोहोचली. २०२३ पर्यंत या व्यवसायाची व्याप्ती ११.९७ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. इंटरनेट वापरकर्ते जसजसे वाढतील तसतशी ही वाढ आणखी आणखी होत जाईल.

७३ टक्क्यांहून अधिक लोक OTT प्लॅटफॉर्मवर प्रादेशिक आशयाला प्राधान्य

२०२१ पर्यंत भारतातल्या इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ७३५ दशलक्षच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यातही ७३ टक्क्यांहून अधिक लोक OTT प्लॅटफॉर्मवर प्रादेशिक आशयाला प्राधान्य देतील असं सांगितलं जातं. केपीएमजीच्या अहवालानुसार आज भारतीय लोक सरासरी २० ते २५ मिनिटं OTTप्लॅफॉर्मवर वावरतात. या सगळ्यावरून आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मचा व्यावसायिकदृष्टय़ा कसा विचार केला जात असेल याचा अंदाज येऊ शकतो.

लॉकडाऊन कालावधीत एकीकडे नव्या सिनेमांचे, मालिकांच्या पुढील भागांच चित्रीकरण थांबले असून मनोरंजाची ही गरज भागवण्याचं काम OTT सारख्या प्लॅटफॉर्मने केले आहे. नेटफ्लिक्स, ऍमेझॉन, हॉटस्टार, एमएक्स प्लेयर ही नावं प्रत्येक घरात ओळखीची वाटू लागली आहेत. प्रामुख्याने इंग्रजी आणि हिंदी भाषेतला कंटेण्ट दाखवणाऱ्या या प्लॅटफॉर्मवर आता मराठीसह स्थानिक भाषांचा कंटेण्टही येऊ लागलाय त्यामुळे मनोरंजनाची गरज भागविणे आता सहज आणि सोपे ठरू लागले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म पाश्चिमात्य देशांमधूनच आपल्याकडे आलेत. जगभरात या प्लॅटफॉर्मन्सला मागणी आहे. इंग्रजी कंटेण्ट सर्वाधीक पाहीला जात असला. तरीही स्थानिक भाषेतही ओटीटी प्लॅटफॉर्म खूप चालतात.

मर्यादा सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक आणि आर्थिकही

या प्लॅटफॉर्मचा वापर सर्रासपणे होत असला तरी देखील त्याला काही मर्यादाही आहेत. या मर्यादा सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक आणि आर्थिकही आहेत. अजूनही ओटीटी हा तळागाळात पोचलेला नाही. तो मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय वर्गाला सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक बंधनांच्या पलिकडे जाऊन ओटीटी पाहण्याची मुभा देत असेलच असे नाही. लॉकडाऊनच्या काळात मोठया संख्येने प्रेक्षक वर्ग ओटीटीकडे वळालेला दिसतो. हा प्रेक्षक आर्थिक दृष्ट्याही सक्षम तसेच सुशिक्षित देखील आहे. या प्रेक्षकांना इंग्रजीचं पुरेसं ज्ञान आहे. असा एकप्रकारे विकसित झालेला प्रेक्षक वर्ग ओटीटीनं या लॉकडाऊनच्या काळात मिळवलाय.

ओटीटी प्लॅटफॉर्मचा वाढत्या वापराबरोबरच या माध्यमांना टीका आणि आरोपांचा सामना देखील करावा लागतो. स्वस्त सदस्यतांच्या श्रेणींमध्ये भाषेपासून ते शैलीपर्यंतच्या प्रचलित सामग्रीच्या उपलब्धतेमुळे, काही लोकांना वाटते की असे कोणतेही प्रमाणीकरण किंवा प्रमाणपत्र नाही ज्याद्वारे सामग्री प्रसारण करण्यापूर्वी / प्रकाशित होण्यापूर्वी मान्यता असणे आवश्यक असते. याविषयीची माझी समज असेल की, अनेक काळापासून पाश्चात्य प्रवृत्ती किंवा संस्कृती आपल्याला बर्‍याच प्रकारे आकर्षित करीत आहे. आम्हाला बर्‍याच काळापासून त्यामाध्यमातून प्रेरणा मिळत आहे. चित्रपट, मालिका, डेली सोप हे यांचे उत्तम उदाहरण आहे. पूर्वी ओटीटी सेवा व्हॉट्सअ‍ॅप, हाईक, स्काईप आणि व्हायबरपर्यंत मर्यादित होत्या. परंतु त्यानंतर व्हिडिओ ओटीटींनी दूरसंचार नेटवर्कवर मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सुरुवात केली आहे.

अश्लील आणि हानिकारक कण्टेट

अश्लील आणि हानिकारक कण्टेट ज्यामुळे कदाचित समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. ही अनियमितता विचारात घेऊन ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अनेक कार्यक्रमांमधील माहिती भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करीत असल्याचा आरोपही पीआयएलने केला आहे. असो, पण शेवटी आपण जे निवडतो ते आपल्यावर काय परिणाम करते यावर अवलंबून असते. कोणत्याही साधनाचा वापर कसा आणि कितपत करावा हे आपल्या हातात आहे. मनोरंजनाकरिता निवडणारे हे पर्याय हुशारीने निवडणे हे प्रत्येकाच्या हातात असते म्हणून त्याची निवड ही योग्य रितीने आणि सारासार पध्दतीनेच झाली पाहिजे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

म्हापशाचे सुपुत्र Paulo Travels चे मारियो परेरा यांचं कोरोनामुळे निधन

Team webnewswala

भारतीय नियमांचं पालन करत TikTok चे भारतात Comeback

Web News Wala

Messenger Of God Fame बाबा गुरमीत राम रहीम ला कोरोना

Web News Wala

Leave a Reply