Team WebNewsWala
आरोग्य शहर शिक्षण

ठाणे परदेशात जाणाऱ्या 195 विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘वॉक इन’ पद्धतीने सुरु केलेल्या लसीकरण मोहीमेंतर्गत 195 विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण.

ठाण्यात परदेशात जाणाऱ्या 195 विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण 

Webnewswala Online Team – परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘वॉक इन’ पद्धतीने सुरु केलेल्या लसीकरण मोहीमेंतर्गत 195 विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण. या लसीकरणाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला.

लसीचा तुठवडा असल्याने विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहिले होते, या विद्यार्थ्यांनी लस घेतल्यानंतरच त्यांना परदेशात प्रवेश मिळणार होता, ही बाब लक्षात घेता राज्य शासनाच्या निर्देशनानुसार परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस देण्याची नियोजन केले. त्यानुसार लसीकरण सुरू करण्यात आले असून पहिल्याच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.

विद्यार्थ्यांना  ‘वॉक इन’ लसीकरण सुविधा उपलब्ध

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जावू नये यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना माजीवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात ‘वॉक इन’ लसीकरण सुविधा महापालिकेच्यावतीने उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच सदरच्या केंद्रात लस देण्यात येत असून परदेश प्रवेशपत्र, व्हिसा तसेच संबंधित कागदपत्रांची पडताळणी करूनच लस देण्यात येत आहे. तरी महापालिका क्षेत्रातील परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title – ठाणे परदेशात जाणाऱ्या 195 विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण ( Thane: Vaccination of 195 students going abroad completed )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

पुणे मेट्रो ला ‘मनसे’ विरोध

Web News Wala

वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता

Web News Wala

मराठा आंदोलन बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरी

Team webnewswala

Leave a Reply