Team WebNewsWala
Other शहर

चाकरमान्यांना ठाकरे सरकार चा मोठा दिलासा

Thackeray government's great relief to the servants

चाकरमान्यांना ठाकरे सरकार चा मोठा दिलासा एसटीने जाणाऱ्या चाकरमान्यांना ई-पासची गरज नाही, १० दिवसांवर क्वारंटाइन कालावधी

मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ठाकरे सरकार चा चाकरमान्यांना ठाकरे सरकार चा मोठा दिलासा दिला आहे. त्यानुसार कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा होम क्वारंटाइन कालावधी १४ वरुन १० दिवस करण्यात आला आहे. त्याचबरोबर एसटीने प्रवास करणाऱ्यांना ई-पासची गरज लागणार नाही. पण खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास अनिवार्य असणार आहे. १२ तारखेपूर्वी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना पोहोचायचे आहे. १२ तारखेनंतर ज्यांना कोकणात जायचे आहे, त्यांना स्वॅब टेस्ट करुन तो निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्रशासनाकडे सादर करावा लागणार, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.

क्वारंटाइन होण्याचा कालावधी १० दिवसांचा 

अनिल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ तारखेपूर्वी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना पोहोचायचे आहे. तर १० दिवसांचा क्वारंटाइन होण्याचा कालावधी हा करण्यात आला आहे. कोकणात जे जातील ते सगळे होम क्वारंटाइन होतील. आम्हाला १२ तारखेनंतर कोकणात जायचे असल्याची विनंती अनेकांनी केली आहे. त्यांच्यासाठी नवे नियम असून १२ तारखेनंतर जाणाऱ्यांना जाण्याच्या ४८ तास आधी स्वॅब टेस्ट करुन घ्यावी लागणार आहे. रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच त्यांना परवानगी देता येणार आहे. हा रिपोर्ट प्रशासनाकडे दिल्यानंतर जाण्याची परवानगी दिली जाईल.

एसटी हाच तुमचा ई-पास

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटी सेवा देण्याची तयारी सुरु केली आहे. जे लोक एसटीने प्रवास करणार आहेत त्यांना ई-पासची गरज नाही. एसटी हाच तुमचा ई-पास आहे. पोर्टलमध्ये नोंद असल्याने प्रवाशांची सर्व माहिती आमच्याकडे उपलब्ध असणार आहे, असे अनिल परब यांनी यावेळी सांगितले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

MumUni School Of Thoughts तर्फे प्रा. संजीव चांदोरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Team webnewswala

Disney Layoff थीमपार्कमधील कमर्चाऱ्यांना लॉकडाउन चे चटके

Team webnewswala

मुंबईकरांचे Property Card आता eProperty card ॲपवर

Web News Wala

Leave a Reply