ऑटो शहर

मेट्रो 2 A ‘मेट्रो 7’ मार्गिकेवर मे अखेरीस चाचणी

वर्षांच्या अखेपर्यंत मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 या मार्गिका सुरू करण्याचा MMRDA चा प्रयत्न आहे. मेट्रो मार्गिकेची चाचणी मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात घेतली जाणार

मेट्रो 2 A ‘मेट्रो 7’ मार्गिकेवर मे अखेरीस चाचणी

Webnewswala Online Team 

या वर्षांच्या अखेपर्यंत मेट्रो 2 A ‘मेट्रो 7’  या मार्गिका सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे

मुंबई – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) उभारण्यात येणाऱ्या मेट्रोच्या 2 A आणि 7 मार्गिकेची बहुप्रतिक्षीत चाचणी मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात घेतली जाणार आहे. ‘एमएमआरडीए’ने त्याची तयारी केली असून सुरवातीला आरे ते कामराज नगर या २० किलोमीटर दरम्यानच्या मार्गावर ही चाचणी घेतली जाणार आहे.

एमएमआरडीएच्या गेल्या वर्षीच्या उद्दीष्टानुसार मेट्रो 2 A (दहिसर ते डिएन नगर) आणि मेट्रो 7 (दहिसर पू. ते अंधेरी पू.) या मार्गिकेवर यापूर्वी जानेवारी महिन्यात चाचणी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. तर एप्रिल महिन्यात मेट्रो सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र टाळेबंदीमुळे मजूर गावी गेल्याने हा प्रकल्प रखडला होता.

तसेच मेट्रो गाडीच्या बांधणीमध्ये महत्त्वपूर्ण असलेला एक घटक जपानमधून आयात करण्यास विलंब झाला. त्यामुळे मेट्रोची बांधणी रखडली होती. परिणामी मेट्रो मुंबईत दाखल होण्यास उशीर झाला. त्यामुळे मेट्रो ची चाचणी सुरू होण्यास विलंब झाला आहे. सध्या मुंबईत सहा डब्यांची एक मेट्रो ट्रेन दाखल झाली आहे.ही नमूना ट्रेन चारकोप स्थानकात चाचणीसाठी तयार ठेवण्यात आली आहे.

कामराज नगर ते आरे दरम्यानच्या २० किलोमीटर अंतरात ट्रायल

चारकोप डेपोनजीकच्या कामराज नगर ते आरे दरम्यानच्या २० किलोमीटर अंतराच्या टप्प्यात ही ट्रायल घेतली जाणार आहे. या मार्गावरील कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित भागातील काही कामे अद्याप पुर्ण होणे बाकी असून ती पूर्ण होताच एमएमआरडीएकडून पुढील मार्गावरही चाचणी घेतली जाणार आहे.

दरम्यान, या वर्षांच्या अखेपर्यंत मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ या मार्गिका सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने एमएमआरडीएकडून पावले उचलली जात आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान मेट्रोच्या नमुना गाडीची चाचणी पूर्ण झाल्यानंतर रेल्वे सेफ्टी कमिशनर यांच्याकडे परवानगीसाठी पाठविले जाणार आहे.

दरम्यानच्या काळात एमएमआरडीएकडून मेट्रो स्थानकांची संकेतन (सिग्नलिंग) यंत्रणेची कामे पूर्ण केली जाणार आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

’ मेट्रो 2 A – यलो लाईन – दहिसर ते डिएन नगर – १८.६ किमी – १७ उन्नत स्थानके

’ मेट्रो 7 – रेड लाईन -दहिसर पू. ते अंधेरी पू. – १६.५ किमी – १३ उन्नत स्थानके

Title – Tearm insurance घेताना या १० महत्वपूर्ण चुका टाळा  ( Avoid these 10 important mistakes when taking tearm insurance )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

लवकरच सात नवीन मार्गांवर देखील धावणार बुलेट ट्रेन

Team webnewswala

मद्यपी वाहनचालकाचे सहप्रवासीही दंडपात्र ठाणे पोलिसांचा निर्णय

Web News Wala

जितेंद्र शिर्के भारतीय मराठा कल्याण संघाच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदी

Team webnewswala

Leave a Reply