Team WebNewsWala
मनोरंजन

सुनील ग्रोवर च्या ‘सनफ्लॉवर’ चा टिझर रिलीज

सुनील ग्रोवर ने चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली. आता सनफ्लॉवर वेब सिरीज मध्ये आपला अभिनय सादर करण्यासाठी सज्ज

सुनील ग्रोवर च्या ‘सनफ्लॉवर’ चा टिझर रिलीज

Webnewswala Online Team – भारतीय मनोरंजन क्षेत्रात सुनील ग्रोवरची एक वेगळीच ओळख आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये गुत्थी आणि रिंकूची भूमिका साकारत घरघरात पोहोचलेला सुनील ग्रोवरने अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. त्यानंतर आता तो सनफ्लॉवर वेब सिरीज मध्ये आपला दमदार अभिनय सादर करण्यासाठी सज्ज झालेला आहे.

यावर्षीच्या सुरवातीलाच अॅमेजॉन प्राइम व्हिडीओजची वेब सिरीज ‘तांडव’ मध्ये एका गंभीर भूमिकेत दिसून आला होता. त्यानंतर आता तो झी ५ प्लॅटफॉर्मवर डार्क ह्यूमरमध्ये गुंतलेली मर्डर मिस्त्री असलेली वेब सिरीज ‘सनफ्लॉवर’ मध्ये एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.

वेब सिरीजचा टिझर रिलीज

या वेब सिरीजचा टिझर आज रिलीज करण्यात आलाय. जवळजवळ १ मिनीटाच्या टिझरमध्ये सिरीजमधल्या सर्व पात्रांचा परिचय देण्यात आलाय. ‘सनफ्लॉवर’ मध्ये एका मध्यमवर्गीय हाऊसिंग सोसायटीची कहाणी सांगण्यात आलीय. या सोसायटीचं नाव ‘सनफ्लॉवर’ असं दाखवण्यात आलंय. या सोसायटीत एक मर्डर होतो. या सिरीजची कहाणी मर्डरच्या तपासाने सुरू होते.

११ जूनला झी ५ प्रिमियम प्लॅटफॉर्मवर स्ट्रिमींग

सुनील ग्रोवर या सोसाटीतील रहीवासी दाखवण्यात आलाय. अनेक भूमिकांच्या माध्यमातून या सिरीजमध्ये गंभीर कहाणीत सुद्धा हास्य निर्माण करण्यात आले आहेत. यात सुनीलचा एक डायलॉग आहे. ‘सब इन्स्पेक्टरचा अर्थ काय होतो ?’ असा प्रश्न करणारा सुनीलचा डायलॉग आहे. एकूण आठ एपीसोडची ही वेब सिरीज आहे. येत्या ११ जूनला झी ५ प्रिमियम प्लॅटफॉर्मवर स्ट्रिमींग करण्यात येणार आहे.

या वेब सिरीजमध्ये सुनिल व्यतिरिक्त इन्स्पेक्टर दिगेंद्रच्या भूमिकेत रणवीर शौरी, इन्स्पेक्टर तांबेच्या भूमिकेत त्यांच्या टीमचे साथीदार गिरीश कुलकर्णी, दिलीप अय्यरच्या भूमिकेत आशीष विद्यार्थी, मिस्टर आहूजाच्या भूमिकेत मुकुल चड्ढा, त्याची पत्नी सौ. आहूजाच्या भूमिकेत राधा भट्ट आणि राज कपूरच्या भूमिकेत आशीष कौशल, सौ. राज कपूरच्या भूमिकेत शोनाली नागरानी आणि सलोनी खन्ना या सर्वांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Web Title –सुनील ग्रोवर च्या ‘सनफ्लॉवर’चा टिझर रिलीज (Teaser release of Sunil Grover’s ‘Sunflower’ )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

Netflix करणार व्हिडिओ गेमिंग मार्केटमध्ये प्रवेश

Web News Wala

विराट तमन्नाला अटक करा; मद्रास उच्च न्यायालयात याचिका

Team webnewswala

निया शर्मा आणि अर्जुन बिजलानीच्या ‘Tum Bewafa Ho’ सॉंग Viral

Web News Wala

Leave a Reply