Team WebNewsWala
सिनेमा

जॉन अब्राहम इमरान हाशमी यांच्या ‘Mumbai Saga’ चा Teaser Realese

जॉन अब्राहम (John Abraham) आणि इमरान हाश्मीचा (Emraan Hashmi) 'Mumbai Saga' या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत.

चित्रपटात जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी व्यतिरिक्त सुनील शेट्टी, महेश मांजरेकर आणि काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत आहेत. ‘मुंबई सागा’ चे लेखक आणि दिग्दर्शक संजय गुप्ता आहेत. भूषण कुमारने हा चित्रपट तयार केला आहे. ‘Mumbai Saga’ 19 मार्च 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

ईदच्या निमित्ताने 12 मे रोजी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

जॉन अब्राहम सध्या’अटॅक’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. त्याने सत्यमेव जयते 2 चे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात जॉनसोबत दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ईदच्या निमित्ताने 12 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय जॉन शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणसोबत पठाण चित्रपटातसुद्धा दिसणार आहे.

इमरान हाश्मी चेहरे या चित्रपटात दिसणार आहे. मंगळवारीच चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. हा चित्रपट 30 एप्रिल रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. इम्रानबरोबर अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. दोघेही पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसतील

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

सुशांतच्या चाहत्यांची दिल बेचारा ला अनोखी श्रद्धांजली

Team webnewswala

सारा आणि वरुणचा ‘कुली नंबर १’ रिलीज डेट जाहिर

Team webnewswala

चिरंजीवीच्या बहुप्रतिक्षीत ‘Acharya’ चा Teaser प्रदर्शित

Web News Wala

Leave a Reply