Team WebNewsWala
Other तंत्रज्ञान नोकरी राष्ट्रीय

‘TCS’ची पात्रता परीक्षा ION आता सर्वांसाठी खुली

तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल आणि योग्य संधी मिळत नसेल तर चिंता करू नका. कारण, आता TCS पात्रता परीक्षा सर्वांसाठी खुली करण्यात आली

तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल आणि योग्य संधी मिळत नसेल तर चिंता करू नका. कारण, आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील ‘TCS’ची पात्रता परीक्षा ION आता सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे.

यामुळे तुमच्या कौशल्याच्या आधारे नोकरी तर मिळेल, पण त्याचबरोबर विविध कॉर्पोरेट्‌सला त्यांच्या अपेक्षेनुसार योग्य उमेदवारही मिळणार आहे.

परीक्षा आणि इतर माहिती :

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या “ION’ विभागाची ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा आहे.

माहिती तंत्रज्ञान (आयटी), बीएफएसआय, उत्पादन, फार्मा, एफएमसीजी क्षेत्रे. या क्षेत्रात मिळू शकते संधी

परीक्षेमध्ये तोंडी, संख्यात्मक आणि तर्क क्षमतांचा समावेश यामध्ये असणार आहे.

दोन वर्षांपर्यंतच्या कामाचा अनुभव असलेले युवा कर्मचारी, सध्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांत शिकत असलेले कोणत्याही शाखेचे विद्यार्थी यासाठी पात्र असणार

कितीवेळा परीक्षा देऊ शकता ?

एनक्‍यूटी प्रत्येक तिमाहीमध्ये घेतली जाईल आणि तिचा स्कोअर दोन वर्षांसाठी वैध मानला जाईल. पहिली टेस्ट निःशुल्क उपलब्ध असणार असून ती 24 ते 26 ऑक्‍टोबर या कालावधीत होईल. यासाठी 17 ऑक्‍टोबरपर्यंत नोंदणी करायची आहे. उमेदवार आपले स्कोअर्स सुधारण्यासाठी अनेक वेळा ही टेस्ट देऊ शकतात.

परीक्षेसाठी कुठे अर्ज कराल ?

https://www.tcsion.com/LX/login#lx

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

बुलेट ट्रेन फक्त गुजरातमध्येच धावणार रेल्वे मंडळाची माहिती

Web News Wala

ठाणे शहराला लवकरच मिळणार नवा विकास आराखडा

Team webnewswala

राजस्थानमध्ये दिवाळी फटाक्यांविनाच होणार साजरी

Team webnewswala

Leave a Reply