Team WebNewsWala
मनोरंजन शहर

मल्टिप्लेक्सच्या प्रत्येक खेळासाठी १००० रुपये रंगभूमी कर

कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे यंदाचा ‘लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (लिफी) ऑनलाईन आयोजित केला जाणार आहे.

प्रत्येक पडद्यासाठी १००० रुपये कर; करमणुकीच्या कार्यक्रमांच्या करातही वाढ

मुंबई : बहुपडदा (मल्टिप्लेक्स) चित्रपटगृहांवर आकारण्यात येणाऱ्या ‘रंगभूमी कर’ च्या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. नव्या पद्धतीनुसार मल्टिप्लेक्सच्या प्रत्येक पडद्यावरील प्रत्येक खेळासाठी १००० रुपये कर आकारला जाणार आहे. याबरोबरच अन्य चित्रपटगृहे, नाटक, जलसा, संगीताचे कार्यक्रम व अन्य कोणत्याही करमणुकीच्या कार्यक्रमांच्या रंगभूमी करातही वाढ करण्याचे पालिकेने ठरवले आहे.

टाळेबंदीमुळे पालिकेचे उत्पन्न बुडालेले असताना आता महसूलवाढीसाठी पालिका नवनवीन पर्याय पुढे आणण्याची शक्यता आहे. त्यातच आता पालिकेने रंगभूमी कराची नवीन कररचना तयार केली आहे. या नव्या कररचनेबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मांडला आहे. स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारच्या परवानगीसाठी पाठवला जाणार आहे. राज्य सरकारने परवानगी दिल्यास त्याची मुंबईत अंमलबजावणी होईल.

चित्रपट, नाटक, बंदिस्त सभागृहात होणारे करमणुकीचे कार्यक्रम, सर्कस, आनंद मेळा अशा विविध करमणुकीच्या कार्यक्रमांवर पालिका ‘रंगभूमी कर’ लावत असते

यांमधून मराठी व गुजराती भाषांतील खेळांना सूट दिली जाते. २०१० पासून हे कर १०० रुपयांच्या आत आहेत. २०१५ मध्ये हे कर वाढवण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. मात्र राज्य सरकारकडे अद्याप तो प्रस्ताव प्रलंबित आहे. आता प्रशासनाने रंगभूमी कराची रचना बदलून नवीन प्रस्ताव तयार केला आहे.

नवीन रचनेत कर वाढणार

आतापर्यंत वातानुकूलित चित्रपटगृहांसाठी सरसकट प्रत्येत खेळासाठी ६० रुपये कर आकारला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत उदयास आलेल्या बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये एकाच इमारतीत १ ते ८ पडदे असतात. त्यांची आसनक्षमता ५० ते २५० इतकी असून तिकीट दर २०० ते १५५० च्या दरम्यान असतात. त्यामुळे करमणूक करात वाढ करण्याचे पालिकेने ठरवले आहे.

प्रत्येक पडद्यावरील प्रत्येक खेळासाठी १००० रुपये कर आकारला जाणार आहे.

संगीत मैफलही महाग

बंदिस्त जागेत अथवा खुल्या मैदानात होणारे संगीत उत्सव, करमणुकीच्या तसेच इतर कार्यक्रमांचा करही ३३ रुपयांवरून १० हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

प्रस्तावित कर (रुपयांत)

प्रकार                                                            सध्याचा कर     प्रस्तावित कर

मल्टिप्लेक्स                                                             ६०            १०००

वातानुकूलित सिनेमागृह                                           ६६           २००

वातानुकूलित नसलेले सिनेमागृह                              ५०           १५०

नाटक, जलसा, करमणुकीचे इतर कार्यक्रम                २८          १००

सर्कस, आनंद मेळा (प्रतिदिन)                                   ५५           १००

पाच हजारपेक्षा जास्त प्रेक्षकांच्या

उपस्थितीत कार्यक्रम                                                ३३           १०,०००

बंदिस्त, खुल्या जागेत होणाऱ्या कार्यक्रमासाठी

व इतर करमणूक कार्यक्रमांसाठी                               ३३             १२०

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मेट्रो कारशेड प्रकरणी न्यायालयाची जिल्हाधिकाऱ्यांना तंबी

Team webnewswala

बडे चित्रपट ‘आस्थे कदम’, जुन्याच्या प्रदर्शनावर वाद

Team webnewswala

लोकल प्रवासासाठी खोटे QR Code बनवून देणारा अटकेत

Team webnewswala

Leave a Reply