Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय व्यापार

टाटा सन्स खरेदी करणार Air Asia चे ३२.६७ टक्के शेअर्स

: एअर एशिया ग्रुप (Air Asia Group BHD) आपल्या भागभांडवलमधील ३२.६७ टक्के हिस्सा विक्री करणार आहे. एअर एशियाचे हे शेअर्स टाटा सन्स (Tata Sons Ltd) खरेदी करणार आहे.

नवी दिल्ली : एअर एशिया ग्रु (Air Asia Group BHD) आपल्या भागभांडवलमधील ३२.६७ टक्के हिस्सा विक्री करणार आहे. एअर एशियाचे हे शेअर्स टाटा सन्स (Tata Sons Ltd) खरेदी करणार आहे. टाटा सन्सकडे सध्यस्थितीत एअर एशियाची ५१ टक्के हिस्सा आहे. त्यामुळे आता हा व्यवहार पर्ण झाल्यानंतर टाटा समूहाकडे एअर एशिया इंडिया मधील हिस्सा हा ५१ टक्क्यांवरुन ८३.६७ टक्के इतका वाढणार आहे. तर उर्वरित हिस्सा हा एअर एशियाकडे आहे.

टाटा सन्सचा हिस्सा वाढून ८३.६७% होणार

एअर एशिया ही एक मलेशियाची एअरलाईन्स कंपनी आहे. एअर एशियाने मंगळवारी मलेशियन स्टॉक एक्सचेंजला सांगितले की, त्यांच्या हिस्स्यातील ३२.६७ टक्के हिस्सा विक्री करणार आहेत. असे म्हटलं जात आहे की, एअर एशिया भारतातीय व्यवसायातून बाहेर पडायचं आहे.

यापूर्वी टाटा सन्सच्या संयुक्त उपक्रमाचा भाग म्हणून एअर एशिया इंडियाच्या ४९% मालकीची असलेल्या या विमान कंपनीने म्हटले आहे की, या विक्रीमुळे कंपनीला त्यांच्या इतर आशियाई बाजारपेठेतील व्यवसाय पुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्रीत करता येईल.

Air Asia चे इतर आशियाई बाजारपेठेतील व्यवसाय पुनर्प्राप्तीवर लक्ष

या व्यवहारामुळे अल्पावधीत कंपनीच्या रोखीची घट कमी होईल आणि एअर एशियाला मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया आणि फिलिपिन्समधील दीर्घ काळापासून त्याच्या आशियाईमधील प्रमुख बाजाराच्या पुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्रीत करण्यास मदत होईल असंही कंपनीने म्हटलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला एअर एशियाने अशाच प्रकारे जपानमधून बाहेर पडण्यास सुरुवात केली होती.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

२०२१ असणार भयानक, बाबा वेंगा ची भविष्यवाणी

Web News Wala

प्लास्टिक Face Shild Coronavirus पासून बचावासाठी बिनकामाच्या

Team webnewswala

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुखही Home Quarantine

Team webnewswala

Leave a Reply