Team WebNewsWala
व्यापार

बिग बास्केट ला खरेदी करत टाटांची रिटेल क्षेत्रात उडी

बिग बास्केट ला खरेदी करत टाटांची रिटेल क्षेत्रात उडी. टाटा सन्सने टाटा डिजिटलच्या माध्यमातून बिग बास्केट मधील ६४.३ टक्के हिस्सा विकत घेतला

बिग बास्केट ला खरेदी करत टाटांची रिटेल क्षेत्रात उडी

Webnewswala Online Team – टाटा सन्सने (Tata Sons) आपल्या सहाय्यक कंपनी असलेल्या टाटा डिजिटलच्या (Tata Digital) माध्यमातून बिग बास्केटमधील (Big Basket) ६४.३ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. सुपरमार्केट ग्रॉसरी सप्लाय करणाऱ्या बिग बास्केटचा सर्वाधिक हिस्सा याआधी अलिबाबाकडे होता. कोरोना महामारीमुळे तसेच लॉकडाउनमुळे ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रात वाढ झाली. लोक अन्न तसेच किराणा सामानही ऑनलाइन मागवू लागले. त्यामुळे बिग बास्केटमध्ये हिस्सेदारी घेण्याबाबत टाटा सन्सने सीसीआयकडे मागणी केली होती.

बिग बास्केट ला खरेदी करत टाटांची रिटेल क्षेत्रात उडी

बिग बास्केटमध्ये टाटांनी गुंतवणूक केल्याने भारतातील ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. बिग बास्केटमधील हिस्सेदारी खरेदी करण्यात टाटा ग्रुपसोबत अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, जिओमार्ट आणि ग्रुफर्सची जोरदार स्पर्धा होती. या सर्व कंपन्या ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या आहेत.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने एप्रिलमध्ये टाटा डिजीटलला सुपरमार्केट ग्रॉसरी सप्लाय प्रायव्हेट (एसजीएस) तर्फे चालवल्या जाणाऱ्या बिग बास्केटमध्ये ६४.३ टक्क्यांपर्यंतचा हिस्सा संपादन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. टाटांनी कराराबाबतची अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे, तर बिग बास्केटनेही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

एक सुपर अ‍ॅप सुरू करण्याची योजना

दरम्यान, टाटा समूहाने आधीच एक सुपर अ‍ॅप सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये क्विम (फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म), टाटा सीलिक (लाइफस्टाइल ऑनलाइन शॉपिंग साइट) आणि क्रोमा (इलेक्ट्रॉनिक )चा समावेश आहे. सुपर अ‍ॅप २०२२ या आर्थिक वर्षात टाटा डिजिटलद्वारे लाँच केले जाणार आहे. बिग बास्केटची स्थापना २०११ मध्ये करण्यात आली होती. सध्या देशभरातील महत्त्वाच्या २५ शहरांमध्ये त्याचा कारभार चालतो.

Web Title – बिग बास्केट ला खरेदी करत टाटांची रिटेल क्षेत्रात उडी ( Tata jumps into the retail sector by buying Big Basket )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

Reliance Jio Q2 कंपनीच्या नफ्यात तिप्पट वाढ

Team webnewswala

मुकेश अंबानी करणार बिल गेट्स यांच्या व्हेंचरमध्ये गुंतवणूक

Team webnewswala

करोनाकाळात वृत्तपत्रांच्या रद्दीला तिप्पट भाव

Team webnewswala

Leave a Reply