Team WebNewsWala
तंत्रज्ञान

Task Mate App टास्क पूर्ण करुन कमवा पैसे

अ‍ॅपच्या मदतीने युजर्स घरबसल्या मोबाइलवर काही सोप्या टास्क पूर्ण करुन पैसे कमवू शकतात. Task Mate असं गुगलच्या या नव्या अ‍ॅपचं नाव आहे.

दिग्गज सर्च इंजिन गुगलने आपल्या युजर्ससाठी एक जबरदस्त अ‍ॅप डेव्हलप केलंय. या अ‍ॅपच्या मदतीने युजर्स घरबसल्या मोबाइलवर काही सोप्या टास्क पूर्ण करुन पैसे कमवू शकतात. Task Mate असं गुगलच्या या नव्या अ‍ॅपचं नाव आहे. सध्या हे अ‍ॅप केवळ बीटा युजर्ससाठी उपलब्ध झालं असून त्याची चाचणी सुरू आहे, लवकरच सर्व युजर्ससाठी हे अ‍ॅप रोलआउट केलं जाण्याची शक्यता आहे.

‘टास्क मेट’ या अ‍ॅपमध्ये बिजनेस करणाऱ्या लोकांद्वारे पोस्ट केलेल्या अनेक टास्क उपलब्ध असतील. सर्व टास्क Sitting किंवा Field अशा श्रेणींमध्ये विभागले असतील. तुम्ही कोणत्या लेवलवर आहात किंवा तुम्ही किती टास्क पूर्ण केलेत किंवा किती टास्क बरोबर होते याची माहितीही अ‍ॅपद्वारे मिळेल.

टास्कमध्ये हॉटेल/दुकानाचा फोटो घेणं, सर्व्हेच्या प्रश्नांची उत्तरं देणं, इंग्रजी भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतर करणं अशा गोष्टींचा समावेश असेल.

जिंकलेले पैसे Cash Out या पर्यायावर क्लिक करुन काढू शकतात

टास्क जिंकल्यानंतर युजरला स्थानिक चलनात पैसे मिळतील, म्हणजे एखादा भारतीय टास्क जिंकल्यास तो रुपयांमध्ये पैशांची मागणी करु शकतो. यासाठी युजरला ई-वॉलेट आणि अकाउंट नंबर पेमेंट पार्टनरसोबत रजिस्टर करावं लागेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर युजर जिंकलेले पैसे Cash Out या पर्यायावर क्लिक करुन काढू शकतात.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

amzon ने आणली कर्नाटकाच्या झेंडयाची बिकिनी

Web News Wala

WhatsApp वरून तुमच्या वागणुकीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचं समोर

Team webnewswala

मोबाइल क्षेत्राचा GPRS ते 5 G प्रवास

Team webnewswala

Leave a Reply