Team WebNewsWala
ऑटो

साडेचार लाखात घरी न्या नवी इलेक्ट्रिक कार Strom R3

साडेचार लाखात घरी न्या नवी इलेक्ट्रिक कार Strom R3 थ्री व्हीलर इलेक्ट्रिक कार भारतात दाखल झाली असून या कारसाठी बुकिंगला सुरुवात.

साडेचार लाखात घरी न्या नवी इलेक्ट्रिक कार Strom R3

नवी दिल्ली – प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, आता Strom R3 थ्री व्हीलर इलेक्ट्रिक कार भारतात दाखल झाली असून या कारसाठी बुकिंगला सुरुवात करण्यात आली आहे.

10,000 रुपयांच्या टोकन अमाऊंटवर बुकिंग सुरु

Strom मोटर्स ने भारतात त्यांची ऑल-इलेक्ट्रिक Strom R3 थ्री-व्हीलरसाठी 10,000 रुपयांच्या टोकन अमाऊंटवर बुकिंग सुरु केलं आहे. या वाहनाला कंपनीने स्पोर्टी लुक प्रदान केला आहे. या कारमध्ये 2-सीटर केबिन असून ज्यामध्ये अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. ही कार 80kmph च्या टॉप स्पीडने धावू शकते. तसेच एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 200 किमीपर्यंतचा प्रवास करते. Strom R3 चं डिझाईन खूपच वेगळं आणि दमदार आहे. या कारमध्ये कंपनीने छोटं बोनट, मोठं ब्लॅकआउट ग्रील ज्यामध्ये हेडलाइट्स वाईड एयर ड्रॅम देण्यात आले आहेत.

750 कोटी रुपयांच्या बुकिंग्स

दरम्यान, स्टॉर्म मोटर्सने सोमवारी जाहीर केले आहे की, त्यांची इलेक्ट्रिक कार Storm R3 साठी आतापर्यंत 165 बुकिंग्स मिळाल्या आहेत. या बुकिंग्सचा एकूण व्यवहार पाहिला तर कंपनीला आतापर्यंत 750 कोटी रुपयांच्या बुकिंग्स मिळाल्या आहेत. ही कार अद्याप बाजारात दाखल झालेली नसून लवकरच ती विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार असून बुकिंग करणाऱ्यांसाठी या कारची डिलिव्हरी सुरु केली जाईल. भारतीय बाजारात या कारची किंमत 4.5 लाख रुपये इतकी आहे.

2022 मध्ये वितरण सुरु

स्ट्रॉम मोटर्स या कंपनीची स्थापना 2016 मध्ये प्रतीक गुप्ता आणि जिएन-लुक अबाजिऊ यांनी केली होती. देशाची राजधानी दिल्ली आणि मुंबई येथे चार दिवसांपूर्वी कंपनीच्या या कारचे बुकिंग सुरू करण्यात आले आहे. 2022 पासून या दोन्ही शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात या वाहनाची डिलिव्हरी करण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. दुसर्‍या टप्प्यात बंगळुरू आणि पुण्यासारख्या शहरात या कारचे वितरण होईल. मुंबई आणि दिल्ली या दोन्ही शहरांकडून कंपनीला मोठ्या प्रमाणात बुकिंग्सही मिळू लागल्या आहेत. गुप्ता यांनी यापूर्वी वॉशिंग्टनमध्ये नासाच्या पुरवठादाराबरोबर काम केले आहे. कंपनीचा कारखाना उत्तराखंडमधील काशीपूर येथे आहे. या कारखान्यात दर महिन्याला 500 युनिट्सपर्यंत इलेक्ट्रिक कार्सची निर्मिती केली जाऊ शकते.

कशी आहे Strom R3

या कारच्या साईडला तुम्हाला ब्लॅक्ड आऊट बी पीलर्स, ORVMs, अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. कारच्या मागच्या बाजूला टेललाईट्स देण्यात आले आहेत. ही इलेक्ट्रिक कार 2,907 mm लांब, 185 mm रुंद आणि 550 किलो वजनाची आहे. Strom R3 मध्ये एक सनरूफ, ऑटो क्लायमेट कंट्रोल, पॉवर विंडो, रिमोट कीलेस एंट्री, 12 वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि 3-स्पोक स्टीयरिंग व्हीलसह 2-सीटर केबिन देण्यात आली आहे.

या कारमध्ये 4.3 इंचांचं टचस्क्रीन डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, आयओटी-सक्षम कंटिन्यूअस मॉनिटरिंग सिस्टिमसह 7.0 इंचांचं वर्टिकल-पोस्ट टचस्क्रीन कन्सोल आणि सहायक 2.4 इंच टचस्क्रीन युनिट देण्यात आलं आहे. Strom आर 3 एक लिथियम-आयन बैटरी पॅक आणि एका इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालते. जे 20hp / 90Nm पॉवर आणि टॉर्क देते.

3 वर्षांची वॉरंटी

ही कार ब्रेकिंग आणि तीन ड्रायविंग मोड्ससह येते. इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे मोड्स यात देण्यात आले आहेत. अवघ्या तीन तासात या कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज होऊ शकते. Strom R3 ही कार 2018 मध्ये पहिल्यांदाच सादर करण्यात आली होती. परंतु तेव्हा ही कार भारतीय मार्केटमध्ये लाँच करण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे या कारची किंमत 4.5 लाख रुपये असून कंपनीने या कारसोबत 3 वर्षांची वॉरंटी दिली आहे.

2 रुपयात 5 किलोमीटर धावणार

ही कार 80 किमी / तास वेगाने धावू शकते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तसेच एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 200 किमीपर्यंतचा प्रवास करु शकते. कंपनीने या कारच्या बॅटरीवर 1 लाख किलोमीटर प्रवास किंवा 3 वर्षांपर्यंतची वॉरंटी दिली आहे. तीन तासांत या कारची बॅटरी 100 टक्के चार्ज होते. या कारवरील खर्चाबाबत बोलायचे झाल्यास ही कार 2 रुपयांमध्ये 5 किलोमीटरपर्यंतचं मायलेज देते. म्हणजेच 1 किलोमीटर प्रवास करण्यासाठी या कारवर केवळ 40 पैसे खर्च करावे लागतात.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

रेल्वे वाहतुकीच्या नियोजनासाठी 139 क्रमांकाची सुरुवात

Web News Wala

Ola भारतात लाँच करणार Ola Electric Scooters

Team webnewswala

बुलेटला टक्कर देण्यासाठी बजाज Neuron ने कसली कंबर

Team webnewswala

Leave a Reply