Team WebNewsWala
तंत्रज्ञान

एका OTP वर बदला पोस्टपेड मोबाइल प्रीपेडमध्ये

कोणत्याही कागदपत्रांशिवाय एका OTP वर पोस्टपेड सेवा प्रीपेडमध्ये किंवा प्रीपेड सेवा पोस्टपेडमध्ये रूपांतरित करता येणार आहे. केंद्रीय दूरसंचार विभागाने (डॉट) ही प्रक्रिया सुलभ करण्यास पाऊल उचलले असून, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

एका OTP वर बदला पोस्टपेड मोबाइल प्रीपेडमध्ये

Webnewswala Online Team – आता कोणत्याही कागदपत्रांशिवाय एका OTP वर पोस्टपेड सेवा प्रीपेडमध्ये किंवा प्रीपेड सेवा पोस्टपेडमध्ये रूपांतरित करता येणार आहे. केंद्रीय दूरसंचार विभागाने (डॉट) ही प्रक्रिया सुलभ करण्यास पाऊल उचलले असून, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

एका OTP वर बदला पोस्टपेड मोबाइल प्रीपेडमध्ये

एखाद्या ग्राहकाला सध्या वापरत असलेली पोस्टपेड सेवा प्रीपेडमध्ये रूपांतरित करण्यासाठी बऱ्याच क्लिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. या सगळ्या प्रक्रियेत किमान १० दिवस किंवा त्याहूनही अधिक कालावधी लागतो. त्यामुळे पोस्टपेडमधून प्रीपेड किंवा प्रीपेडमधून पोस्टपेड सेवा घेण्यासाठी सुलभ प्रक्रिया असावी, त्यासाठी विशेष यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशनने केली होती. दूरसंचार विभागाने त्याची दखल घेतली आहे.

मोबाइल सीमकार्ड बदलण्याचीही गरज नाही

यासंदर्भात दूरसंचार कंपन्यांकडून सर्व तपशील मागविण्यात आला असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे दूरसंचार विभागाने म्हटले आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर पोस्टपेड किंवा प्रीपेड सेवा रूपांतरित करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची किंवा KYC ची गरज भासणार नाही. केवळ OTP द्वारे येणाऱ्या सांकेतिक क्रमांकाच्या मदतीने ही सेवा बदलता येईल. विशेष म्हणजे यासाठी मोबाइल सीमकार्ड बदलण्याचीही गरज भासणार नाही.

कधीपासून होणार सुरुवात

दूरसंचार विभागाने या नियमाच्या अंमलबजावणीकरिता सर्व दूरसंचार कंपन्यांना ‘पीओसी’ या यंत्रणेत आवश्यक बदल अथवा सुधारणा करण्याची सूचना केली आहे. ‘पीओसी’ संदर्भातील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच ओटीपी आधारित सुविधा सुरू केली जाईल. हा बदल सर्वच ग्राहकांसाठी सोयीचा आहे. शिवाय कोरोनासारख्या काळात संपर्कविरहित सेवा म्हणून याचा चांगला फायदा होईल, असे दूरसंचार विभागाने म्हटले आहे.

Web Title – एका OTP वर बदला पोस्टपेड मोबाइल प्रीपेडमध्ये ( Switch to OTP in Postpaid Mobile Prepaid )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

एका idea ने उभा राहिला 100 कोटींचा startup

Web News Wala

सोशल मीडिया वापरासाठी, केंद्र सरकारची नियमावली जाहीर

Web News Wala

5 G प्रकरणी अभिनेत्री ‘जुही चावला’ ला 20 लाखांचा दंड

Web News Wala

Leave a Reply