Team WebNewsWala
धर्म पर्यावरण राष्ट्रीय

Surya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’

2021 चे पहिले चंद्रग्रहण, सुपर ब्लड मून पाहिल्यानंतर आता 10 जूनला पहिले सूर्यग्रहण लागणार आहे (Solar Eclipse 2021 You Can See The Ring Of Fire).

Surya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’

Webnewswala Online Team – काहीच दिवसांपूर्वी वर्ष 2021 चे पहिले चंद्रग्रहण लागले होते (Solar Eclipse 2021). हे चंद्रग्रहण खूप खास होते. पण, हे ग्रहण भारतातील काही भागातच दिसून आले, विशेषत: बंगालमध्ये. 2021 चे पहिले चंद्रग्रहण, सुपर ब्लड मून पाहिल्यानंतर आता 10 जूनला पहिले सूर्यग्रहण लागणार आहे (Solar Eclipse 2021 You Can See The Ring Of Fire).

चंद्रग्रहणाप्रमाणेच सूर्यग्रहण ही देखील एक दुर्मिळ घटना होणार आहे. हे ‘रिंग एक्लिप्स’ किंवा ‘रिंग ऑफ फायर’ चे दुर्मिळ दृश्य चिन्हांकित करेल. हे तेव्हा घडते जेव्हा सूर्य आणि चंद्र पृथ्वीच्या अगदी सारखे असतात. कारण, चंद्र पूर्णपणे सूर्याला व्यापत नाही, म्हणूनच तो सूर्याभोवती रिंग सारखी रचना बनवितो.

सूर्यग्रहण 2021 कुठे दिसेल ?

कंकणाकृती सूर्यग्रहण ग्रीनलँड, उत्तर-पूर्व कॅनडा, उत्तर ध्रुव आणि रशियन फास्ट पूर्वेकडील भागांमधून दिसून येईल. तर युरोप, उत्तर अमेरिका, आशिया, आर्कटिक आणि अटलांटिक प्रदेशात अर्धवट सूर्यग्रहण असेल. भारतात अरुणाचल प्रदेश आणि लदाखचा भाग वगळता, सूर्यग्रहण दिसणार नाही.

 ‘रिंग ऑफ फायर’ सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत होणार नाही.

ग्रहण 2021 कधी दिसेल ?

सूर्यग्रहणाला कॅनडा, उत्तरी ऑन्टारियो आणि सुपीरियर तलावाच्या उत्तरकडे सूर्योदयावेळी प्रारंभ होईल. तर संपूर्ण सूर्यग्रहण 10 जून रोजी पहाटे 5:49 वाजता सुरु होईल. ‘रिंग ऑफ फायर’ ही दुर्मिळ घटना कॅनेडियन पाहू शकतील. हे 3 मिनिटे 51 सेकंदांच्या अल्प कालावधीसाठी असेल.

ग्रीनलँडमधील स्थानिक वेळेनुसार, दुपारच्या वेळी ‘रिंग ऑफ फायर’ पहायला मिळेल. तेथून ते उत्तर ध्रुव आणि सायबेरियात दिसून येईल.

‘रिंग ऑफ फायर’ कसे पहावे ?

ज्यांना ही दुर्मिळ घटना बघायची आहे त्यांनी विशेषकरुन आय प्रोटेक्टिव्ह गिअर परिधान केले पाहिजे. कारण, थेट सूर्याकडे पाहण्यामुळे डोळ्यांना गंभीर दुखापत होऊ शकते. म्हणूनच, सूर्यग्रहण पाहण्यासाठी स्पेशल आय गिअर, वेल्डर ग्लास किंवा पिनहोल कॅमरा घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या काही महत्वाच्या खबरदारी आहेत, ज्याद्वारे आपण हे सूर्यग्रहण सहज पाहू शकता.

Web Title – Surya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’ ( Surya Grahan 2021 | First solar eclipse of the year on June 10, ‘Ring of Fire’ )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

Google Pay साठी गुगलकडून गुड न्यूज

Team webnewswala

कोल्हापुरी चप्पल आता अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध

Team webnewswala

चिनी बँकेची बजाज फायनान्स मध्ये मोठी गुंतवणूक

Team webnewswala

Leave a Reply