Team WebNewsWala
क्राईम शहर शिक्षण

पडवे जवाहर नवोदय विद्यालय प्रकरणी राजापूर तहसिल चा अजब कारभार

पडवे जवाहर नवोदय विद्यालय प्रकरणी राजापूर तहसिल चा अजब कारभार राजापूर तालुक्यातील पडवे जवाहर नवोदय विद्यालय मधील बोगस प्रकार मध्यतरी गाजला

पडवे जवाहर नवोदय विद्यालय प्रकरणी राजापूर तहसिल चा अजब कारभार

राजापूर – राजापूर तालुक्यातील पडवे जवाहर नवोदय विद्यालय मधील बोगस प्रकार मध्यतरी खूप गाजला होता, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषद अध्यक्ष यांनी सखोल चौकशी चे आदेश पारित केले पण या आदेशांना तालुका स्तरावर, तहसील आणि शिक्षक विभागाकडून केराची टोपली दाखवली गेली.

चौकशी आदेशांना राजापूर शिक्षक विभागाकडून केराची टोपली

सदर, प्रकार ज्या साने गुरुजी विद्यामांदिर जनशी मध्ये झाला, याची साधी शिक्षण विभागाकडून चौकशी वा अजुन जबाब सुद्धा परिपूर्ण झाले नाहीत. राजापूर शिक्षण विभागाकडून एकच सांगितले जात,की अधीकारी सुट्टीवर आहेत.मग न्याय तो कधी मिळणार. यांची सर्वही जबाबदारी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी श्री.विनोद सावंग यांची आहे परंतु ते ही ह्या विषयाकडे गंभीरपणे पहात नाहीत.

बोगस प्रमाणपत्र कोणतेही नियमांचं अधीन न राहता

संबधीत विषयी राजापूर तहसीलदार ने आपल्या अखत्यारित जनशी मध्ये नवोदय साठी प्रवेश प्रक्रियेत रहिवासी दाखले दिल्याचे कागदपत्रे वरुन दिसून येते. तहसिल यांचे ग्रामीण प्रमाणपत्र, तहसीलदार यांचे रहिवास प्रमाणपत्र, तसेच पालकांचे रहिवासी प्रमाणपत्र) वरील सर्व बोगस प्रमाणपत्र कोणतेही नियमांचं अधीन न राहता परस्पर कोणतेतरी हेतूने आणि स्थानिकांवर अन्याय करुन चुकीच्या मार्गाने, शासनाची दिशाभूल करून, केवळ आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी अश्या प्रकारच्या बोगस कागदपत्रे पुरवुन पर जिल्ह्यातील मुलाना शिक्षण देऊन आणि स्थानिक ना शिक्षक पासून वंचित ठेवू पाहणाऱ्या समनधित अधिकारी वर्ग, शासकीय निम शासकीय यंत्रणावर ताबडतोब कायदेशीर आणि कडक कार्यवाही करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र चे राज्य सचिव श्री. समीर विजय शिरवडकर यांनी केली आहे.

परजिल्ह्यातील विध्यार्थ्यांना रत्नागिरी रहिवासी दाखले

साने गुरुजी विध्यमांदिर जानाशि मधील प्राचार्य श्री.बळवंत जी सुतार यांनी कु.सुमेद सागर कश्यप ( राहणार जनशी) दि.२९/६/२०, तसेच कु.सुमित सरदार कांबळ, ( राहणार कोल्हापूर), कु.यश प्रमोद कांबळे ( राहणार मिठागावने) परंतु ही, तिन्ही मुलं रहिवास कोल्हापूर वाशी असल्याने आपल्या स्वार्थासाठी त्यांना रत्नागिरी रहिवासी कागदपत्रे वरून दाखवण्यात आले आहेत असे दिसुन येते.तसे तहसीलदार यांनी समधीत ग्रामीण विभागाचे सरपंच किव्हा पोलीस पाटील चे १५ वर्षे वास्तव्यचा पुरावा ना विचारात घेता, आपल्या अखत्यारीत कसे काय रहिवासी दाखले देऊ शकतात याची सखोल चौकशी ही झालीच पाहिजे.असेही शिरवाडकर बोलताना म्हणाले. परिसरातील पालकांना माहिती अधिकार महासंघ या पुढे ही साथ देऊन भ्रष्ट आधिकारी वर्गाला त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी साथ देईल.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

ताजमहाल क्षेत्रातील 4000 झाड कापण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

Web News Wala

कोपरी पुल कामासाठी मध्य रेल्वेवर रात्रीचे विशेष ब्लॉक

Web News Wala

प्रगतिशील शेतकऱ्यांकडून ऑर्किड लागवडीचा प्रयोग यशस्वी

Team webnewswala

Leave a Reply