Team WebNewsWala
राजकारण शहर

भिवंडी पालिकेचा अजब कारभार कोट्यवधींच्या घंटागाड्या धुळीत

भिवंडी महापालिकेच्या वाहन विभागाचा कारनामा, भांडार गृहात  घंटागाड्या आणि फायबर शौचालये एक वर्षांपासून धुळीत भंगारात पडून....

भिवंडी पालिकेचा अजब कारभार कोट्यवधींच्या घंटागाड्या धुळीत

भिवंडी – भिवंडी महापालिकेच्या वाहन विभागाचा कारनामा, भांडार गृहात  घंटागाड्या आणि फायबर शौचालये एक वर्षांपासून धुळीत भंगारात पडून….

50 घंटागाड्या आणि 30 फायबर शौचालये धुळीत

भिवंडी शहरातील कचऱ्याची समस्या वाढत असताना  महानगरपालिकाने तब्बल  सव्वातीन करोड रुपये खर्च करून 50 घंटागाड्या आणि 30 फायबर शौचालये खरेदी करून महापालिकेच्या कोंबपाडा येथील भांडार गृहात  ठेवण्यात आल्या असून एक वर्ष घंटागाड्या आणि फायबर शौचालये भंगारात धूळखात सडत आहे.मात्र याकडे महापालिकेच्या वाहन विभागाचा  गलथान कारभार समोर आला आहे.

कचरा उचलण्यासाठी खाजगी ठेकेदाराला लाखो रुपये

महत्वाची बाब म्हणजे शहरातील कचऱ्याची समस्या वाढत असून कचरा उचलण्यासाठी खाजगी ठेकेदाराला दर महिन्याला लाखो रुपये खर्च करून गाड्यांचा वापर करण्यात येत आहे मात्र स्वतःच्या घंटागाड्या असून खाजगी ठेकेदारावर लाखो रुपयांची उधळण का असा संतप्त सवाल नागरिक करीत असून

भिवंडी पालिकेचा अजब कारभार कोट्यवधींच्या घंटागाड्या धुळीत
या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

या प्रकरणाची सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याची लेखी मागणी काँग्रेसचे नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती आणि अरुण राऊत यांनी महापलिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याकडे  केली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.comआमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

इंधन दरवाढीमुळे पुणेकरांची पसंती e Scooter ला

Web News Wala

उंच इमारतीच्या कठड्यावर खतरनाक स्टंट, Video Viral

Team webnewswala

मुंबई आजपासून अनलॉक जाणून घ्या नवीन बदल

Web News Wala

Leave a Reply