पर्यावरण शहर

मुंबईत वर्षांला ३२ हजार श्वानांचे निर्बीजीकरण

भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाचा कार्यक्रम पुन्हा जोरकसपणे राबविण्याचे ठरविले असून वर्षांकाठी ३२ हजार श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येणार आहे.

मुंबई : भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी पालिकेने भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाचा कार्यक्रम पुन्हा जोरकसपणे राबविण्याचे ठरविले असून वर्षांकाठी ३२ हजार श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येणार आहे.

दरवर्षी ३२ हजार श्वानांची नसबंदी करणे आवश्यक

महापालिकेने हा कार्यक्रम १९९४ मध्ये हाती घेतला होता. मात्र विविध कारणांमुळे तो रखडला. आता मुंबईतील श्वानांची संख्या पाहता दरवर्षी ३२ हजार श्वानांची नसबंदी करणे आवश्यक आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी पालिकेने आता सात परिमंडळात सात श्वान पकडणारी वाहने तैनात करण्याचे ठरवले आहे.

भारतीय प्राणी कल्याण मंडळाने घालून दिलेल्या निर्देशानुसार वर्षांला ३० टक्के  श्वानांचे निर्बीजीकरण केले तरच कु त्र्यांची संख्या नियंत्रित राहू शकते. मुंबईतील कुत्र्यांची संख्या पाहता दरवर्षी ३२ हजार कुत्र्यांची नसबंदी करणे आवश्यक आहे. पालिकेच्या श्वाननियंत्रण विभागामध्ये कुत्रे पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांची ५० टक्के  पदे रिक्त आहेत, तर पालिकेकडे सध्या श्वान पकडणारी चारच वाहने आहेत. तसेच कुत्र्यांच्या नसबंदी कार्यक्रमासाठी पालिकेने काही अशासकीय संस्थांची नेमणूकही केली होती. तरीही कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे उद्दिष्ट साध्य होत नव्हते.

अतिरिक्त १७ हजार श्वान पकडण्याचे उद्दिष्ट 

अशासकीय संस्थांच्या मार्फत जास्तीत जास्त १५ हजार श्वान पकडून त्यांचे निर्बीजीकरण केले आहे. त्यामुळे पालिकेने अशासकीय संस्थांच्या जोडीनेच पालिकेच्या यंत्रणेमार्फत अतिरिक्त १७ हजार श्वान दरवर्षी पकडण्याचे ठरवले आहे. त्यासाठी सात विभागांत सात वाहने नेमून त्यांना दिवसाचे ८ श्वान प्रति वाहन असे उद्दिष्ट ठरवून देण्यात येणार आहे.

श्वान नियंत्रण खात्याच्या वापराकरिता दोन वर्षांच्या कालावधीकरिता कुशल मनुष्यबळासह सात वाहने उपलब्ध करण्याकरिता पालिका कंत्राट देणार आहे. यासाठी पालिका २ कोटी ३८ लाख रुपये खर्च करणार असून तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.

३४,९४४ श्वान पकडण्याचे उद्दिष्ट

दोन वर्षांकरिता चालक व श्वान पकडणारे चार कुशल मनुष्यबळ यांच्यासह या वाहनांचा वापर करण्यात येणार आहे. दोन वर्षांत ३४,९४४ श्वान पकडण्याचे उद्दिष्ट या कंत्राटात देण्यात येणार आहे. एक कुत्रा पकडून आणून नसबंदीनंतर परत त्या विभागात सोडण्याची किं मत ६८० रुपये ठरवण्यात आली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पडवे जवाहर नवोदय विद्यालय प्रकरणी राजापूर तहसिल चा अजब कारभार

Web News Wala

परदेशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु

Web News Wala

राज्यात सव्वादोन लाख सरकारी पदे रिक्‍त

Team webnewswala

Leave a Reply