Team WebNewsWala
धर्म शहर

हनुमान जयंती साठी राज्यशासनाकडून मार्गदर्शक सुचना जाहीर

कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने यावर्षी 27 एप्रिल हनुमान जयंती उत्सव नागरिकांनी साधेपणाने आपापल्या घरी साजरा करावा, असे आवाहन गृह विभागाने केले

हनुमान जयंती साठी राज्यशासनाकडून मार्गदर्शक सुचना जाहीर

मुंबई – हनुमान जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा केला जातो. परंतू, कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने यावर्षी 27 एप्रिल, 2021 रोजीचा हनुमान जयंती उत्सव नागरिकांनी साधेपणाने आपापल्या घरी साजरा करावा, असे आवाहन गृह विभागाने केले आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या तरतुदींच्या अधिन राहून यावर्षी हनुमान जयंती

कोरोना स्थितीत सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या अतिसंसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता व वाढत्या कोविड रुग्णांच्या संख्येचा विचार करता महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या 13 एप्रिल, 2021 च्या आदेशामधील मुद्दा क्र.1,2,7 व 10 मध्ये नमूद तरतुदींच्या अधिन राहून यावर्षी हनुमान जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.

लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपापल्या घरी हनुमान जयंती उत्सव साजरा करावा

त्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपापल्या घरी हनुमान जयंती उत्सव साजरा करावा. कोरोना प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. यावर्षी मंदिरात भजन, किर्तन, पठण इत्यादींचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये.

मंदिरामधील व्यवस्थापक, विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केबल नेटवर्क, वेबसाइट व फेसबुक आदींद्वारे उपलब्ध करून द्यावी. हनुमान जयंती उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढू नयेत.

कोरोनाच्या अनुषंगाने शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मुंबईतील २४ ‘मियावाकी’ वनांना बहर

Web News Wala

मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले संबोधित केल्या अनेक घोषणा

Team webnewswala

लॉकडाऊन च्या काळात कास पठारावर दुर्मीळ फुलांचा बहर

Team webnewswala

Leave a Reply