Team WebNewsWala
अर्थकारण ठळक बातम्या राष्ट्रीय

State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल

एटीएममधून अथवा बँकेच्या शाखेतून रोख रक्कम काढणे, चेकबुक या संदर्भातले State Bank of India चे नियम 1 जुलै 2021 पासून बदलणार

State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल

Webnewswala Online Team – एटीएममधून अथवा बँकेच्या शाखेतून रोख रक्कम काढणे, चेकबुक या संदर्भातले State Bank of India चे नियम 1 जुलै 2021 पासून बदलणार आहेत. नियमांतील बदलांचा थेट सामान्य खातेदारांवर परिणाम होणार आहे. यामुळेच खातेदारांनी हे नियम जाणून घेणे आवश्यक आहे. SBI ATM Cash Withdrawal, Cheque Book Rules, Charges to Change from Next Month

एसबीआय बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट योजना

आपल्याकडे आधारकार्ड आणि पॅनकार्ड असेल तर बँक खाते उघडण्याचा फॉर्म आणि केवायसी फॉर्म भरुन तसेच आधार आणि पॅन क्रमांकाची माहिती देऊन १८ वर्षे पूर्ण झालेली सामान्य व्यक्ती स्टेट बँकेत एसबीआय बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट योजनेंतर्गत झिरो बॅलन्स अकाउंट सुरू करू शकेल. यात किमान शिल्लक म्हणून शून्य रक्कम ठेवता येईल. जास्तीत जास्त सामान्यांना स्टेट बँकेत खाते उघडता यावे यासाठी ही योजना १ जुलै २०२१ पासून सुरू होत आहे. एसबीआय बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट योजनेंतर्गत खाते सुरू करणाऱ्या खातेधारकांना स्टेट बँक रुपे एटीएम कम डेबिट कार्ड देणार आहे. हे कार्ड वापरुन संबंधित खातेधारक त्याच्या स्टेट बँकेतील खात्यात असलेल्या रकमेतून हवी तेवढी रक्कम काढू शकेल. अथवा कार्ड पेमेंट करुन स्टेट बँकेतील खात्यात असलेल्या रकमेतून थेट एखाद्या व्यवहारासाठी पैसे देऊ शकेल.

एसबीआय बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट योजनेंतर्गत खातेधारकाला एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त दहा चेकचे एक चेकबुक विनामूल्य देईल. यानंतरच्या त्याच आर्थिक वर्षातल्या नव्या चेकबुकसाठी खातेधारकाला शुल्क द्यावे लागेल.

चेकबुकसाठीचे नियम
  1. दहा चेकच्या एका चेकबुकसाठी ४० रुपये आणि जीएसटी लागू
  2. २५ चेकच्या एका चेकबुकसाठी ७५ रुपये आणि जीएसटी लागू
  3. तातडीची मागणी म्हणून दिलेल्या दहा चेकच्या एका चेकबुकसाठी ५० रुपये आणि जीएसटी लागू
  4. ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकवर नवे सेवाशुल्क आकारले जाणार नाही
  5. कोणत्याही प्रकारच्या बिलांचा भरणा, कर भरणा करण्यासाठी ऑनलाइन व्यवहार केल्यास त्यावर शुल्क आकारले जाणार नाही
  6. स्वतःसाठी चेकद्वारे स्वतःच्या खात्यातील रकमेतून दिवसभरात जास्तीत जास्त एक लाख रुपये काढण्याची परवानगी
  7. चेक न भरता फक्त विड्रॉवल स्लिप (पैसे काढण्याचा फॉर्म) भरुन आणि पासबुक दाखवून स्वतःच्या खात्यातील रकमेतून दिवसभरात जास्तीत जास्त २५ हजार रुपये काढण्याची परवानगी
  8. दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी चेक देऊन स्वतःच्या खात्यातील रकमेतून दिवसभरात जास्तीत जास्त ५० रुपये हस्तांतरित करण्याची परवानगी

Web Title – State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल ( State Bank of India changes in ATM and checkbook rules )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

‘कोरोनिल’ वरुन बाबा रामदेव अडचणीत कोर्टानं बजावले समन्स

Web News Wala

विजय मल्ल्याला बँका देणार दणका; ‘ब्लॉक’ डीलची तयारी

Web News Wala

कोरोना लसीवर MRP छापायची सक्ती

Web News Wala

1 comment

State Bank of India एटी&#2319... June 11, 2021 at 1:25 pm

[…] एटीएममधून अथवा बँकेच्या शाखेतून रोख रक्कम काढणे, चेकबुक या संदर्भातले State Bank Of India चे नियम 1 जुलै 2021 पासून बदलणार  […]

Reply

Leave a Reply