Team WebNewsWala
राष्ट्रीय व्यापार

कोरोना काळात सुद्धा भारतात Startup चा बोलबाला

गेल्या १८० दिवसात म्हणजे सहा महिन्यात १० हजार नवीन Startup नोंदले गेले असून त्यात अन्न प्रक्रिया, उत्पादन विकास, App डेव्हलपमेंट, आयटी कन्सल्टन्सी यांची संख्या अधिक

कोरोना काळात सुद्धा भारतात Startup चा बोलबाला

Webnewswala Online Team – कोरोना काळात अनेक उद्योग डबघाईला आले असताना भारतात Startup विकास खुपच वेगाने झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या १८० दिवसात म्हणजे सहा महिन्यात १० हजार नवीन Startup नोंदले गेले असून त्यात अन्न प्रक्रिया, उत्पादन विकास, अॅप्लीकेशन डेव्हलपमेंट, आयटी कन्सल्टन्सी यांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे यातील ४५ टक्के स्टार्टअपचे नेतृत्व महिला करत आहेत.

२०१६ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी Startup India योजना जाहीर केली आहे. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड यासाठी नोडल एजन्सी म्हणून काम करते. २०१६-१७ मध्ये ७४३ Startup ना मान्यता दिली गेली होती. गतवर्षी २०२०-२१ मध्ये १६ हजाराहून अधिक स्टार्टअपना मान्यता मिळाली. ३ जून २०२१ पर्यंत मान्यता मिळालेल्या स्टार्टअपचा आकडा ५० हजारावर गेला आहे.

करोना मुळे ऑनलाईन व्यवसायला चालना मिळाली त्याचा फायदा Startup ना मिळाला आहे. करोना मुळे थांबलेले फंडींग सप्टेबर २०२० पासून पुन्हा सुरु झाले आहे त्यामुळे Startup चा विकास वेगाने होत असून मान्यताप्राप्त स्टार्टअप देशातील ६२३ जिल्यात सुरु आहेत. रोजगार वाढीत या स्टार्टअपनी महत्वपूर्ण योगदान दिले असून २०२०-२१ मध्ये १ लाख ७० हजार लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.

Web Title – कोरोना काळात सुद्धा भारतात Startup चा बोलबाला ( Startups flourished in India even during the Corona period )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

सॅमसंग मोबाईल चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्जर शिवाय

Team webnewswala

Loan Moratorium सुप्रीम कोर्टाने दिला मोठा दिलासा

Team webnewswala

विरोधानंतर WhatsApp बॅकफूटवर

Web News Wala

Leave a Reply