Team WebNewsWala
आरोग्य राजकारण शहर

ग्लोबल हब मध्ये कायमस्वरूपी रुग्णालय सुरू करा – नारायण पवार

ग्लोबल इम्पॅक्ट हबम ध्ये तात्पुरत्या उभारलेल्या १३०० बेडच्या हॉस्पिटलचे कायमस्वरुपी हॉस्पिटलमध्ये रुपांतर करावे, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.

ठाणे : मुंबई महापालिकेच्या केईएम हॉस्पिटलच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने ग्लोबल इम्पॅक्ट हबम ध्ये तात्पुरत्या उभारलेल्या १३०० बेडच्या हॉस्पिटलचे कायमस्वरुपी हॉस्पिटलमध्ये रुपांतर करावे, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.

महापालिकेच्या मालकीच्या ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी १०२४ बेडचे हॉस्पिटल तयार करण्यात आले. तात्पुरत्या स्वरुपाच्या या हॉस्पिटलसाठी अद्ययावत यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली.

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या इमारतीला ३० वर्षांचा काळ पूर्ण झाला असताना, नव्या इमारतीत हॉस्पिटल ही काळाची गरज असल्याचे मत नारायण पवार यांनी व्यक्त केले आहे.

दर्जेदार सरकारी हॉस्पिटलची आवश्यकता

त्याचबरोबर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने आणखी ३०० बेडची संख्या वाढविण्यात आली. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये १३२४ बेड उपलब्ध होणार आहेत. ठाणे महापालिकेचे हे रुग्णालय जिल्ह्यात सर्वात मोठे हॉस्पिटल आहे. कोरोनाची आपत्ती ओसरल्यावर तात्पुरत्या स्वरुपाचे हॉस्पिटल बंद करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, ठाणे शहर व जिल्ह्याची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था डळमळीत झाली असताना, दर्जेदार सरकारी हॉस्पिटलची आवश्यकता आहे.

ठाणे व पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येणारे रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले जातात. या हॉस्पिटलची क्षमता केवळ २७० बेडची आहे. त्यामुळे अनेक रुग्ण छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे वा मुंबईतील रुग्णालयाकडे पाठविले जातात. त्यात रुग्ण व नातेवाईकांचे हाल होतात, याकडे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.

केवळ ५०० रुग्णक्षमतेचे महापालिकेचे रुग्णालय अपुरे

महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या इमारतीला ३० वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे. काही काळानंतर या रुग्णालयाची दुरुस्ती करावी लागणार आहे. या ठिकाणी ५०० बेडची क्षमता आहे. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २५ लाखांवर गेली असताना, केवळ ५०० रुग्णक्षमतेचे महापालिकेचे रुग्णालय अपुरे पडणार आहे. त्यानंतर नव्याने हॉस्पिटल उभारण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागेल.

सध्या कोरोनानिमित्ताने ग्लोबल हब येथे उभारलेले हॉस्पिटल कायम ठेवल्यास आणखी १३०० बेड उपलब्ध होणार आहेत. त्यात मुंबईतील केईएम हॉस्पिटलच्या धर्तीवर सामान्यांना सुविधा दिल्यास रुग्णांना दिलासा मिळू शकेल. या पार्श्वभूमीवर ग्लोबल हबमध्ये कायमस्वरुपी रुग्णालय सुरू ठेवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गंगापूर धरणावरील पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन

Team webnewswala

ठाणे महानगरपालिका ५२ जागांसाठी भरती, आजच करा अर्ज

Web News Wala

राज्यात सलग पंधरा महिन्यांचा पावसाळा

Web News Wala

Leave a Reply