Other शहर समाजकारण

अपघात होऊ नयेत म्हणून त्या मॅनहोलजवळ ७ तास उभ्या

Lata kalan

मुंबई  शहरावर आतापर्यंत अनेक संकट आली. कधी अतिरेक्यांचे हल्ले तर कधी नैसर्गिक आपत्ती…पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून मुंबईत अपघात होणं ही तर नित्याची बाब झालेली आहे. मात्र या सर्व गोष्टींवर मात करुन काही मुंबईकर शहराच्या भल्यासाठी झटत असतात. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

मुंबईत यादरम्यान चांगलाच पाऊस पडला. या पावसामुळे अनेक भागांत झाडं पडली तर काही भागांत भूस्खलनाचे प्रकारही घडले. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये मुंबईच्या माटुंगा परिसरातील तुळसी पाईप रोडवर एक महिला भर पावसात मॅनहोल शेजारी उभी राहून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांचा अपघात होऊ नये म्हणून त्यांना मार्ग दाखवत होती.

कांता मारुती कलन असं या महिलेचं नाव असून ती माटुंगा स्थानकाबाहेरील फुटपाथवरील झोपडपट्टीत राहते. कांता यांचा फुलांची विक्री करण्याचा धंदा आहे.

३ ऑगस्ट रोजी मुंबईत मुसळधार पावसामुळे सखळ भागात पाणी साचलं होतं. दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे पाईप लाईन भागात पाणी साचायला लागलं.

महापालिकेचे कर्मचारी पाण्याचा निचरा होण्यासाठी येत नसल्याचं पाहून कांता यांनी एका बाईकस्वाराच्या मदतीने रस्त्यावरील मॅनहोलचं झाकण उघडलं आणि रस्त्यावर साचलेल्या पाण्याला वेगळी वाट करुन दिली.

मॅनहोलचे झाकण उघडल्यानंतर वाहनचालकांचा अपघात होईल हे त्यांना लक्षात आल्यानंतर कांतता सहा वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत तिकडेच उभं राहत वाहनांना सुरक्षित वाट दाखवत होत्या.

नक्की वाचा >>
देशातील पहिली किसान रेल्वे, शेतकऱ्यांना होणार फायदा
डोंगरी-माझगाव ला जोडणाऱ्या हॅकॉक पुलाच काम अंतिम टप्यात
मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

फेसबुक बंद करणार आपले हे लोकप्रिय अ‍ॅप

Team webnewswala

आधार क्रमांक किती वेळा वापरले आहे तपासा मोबाईल वरून

Web News Wala

बुलेटला टक्कर देण्यासाठी बजाज Neuron ने कसली कंबर

Team webnewswala

Leave a Reply