Team WebNewsWala
शहर

कोपरी पुल कामासाठी मध्य रेल्वेवर रात्रीचे विशेष ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड आणि ठाणे दरम्यान कोपरी पुल ओव्हर ब्रिजसाठी गर्डर टाकण्याचे काम होणार आहे. या कामामुळे रेल्वे वाहतुकीत बदल.

ठाणे : मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड आणि ठाणे दरम्यान कोपरी पुल ओव्हर ब्रिजसाठी गर्डर टाकण्याचे काम होणार आहे. कोपरी मार्गावरील रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी होणार असलेल्या या कामामुळे रेल्वे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शनिवार २३ जानेवारीच्या रात्रीपासून रविवार २४ जानेवारीच्या सकाळपर्यंत तसेच रविवार २४ जानेवारीच्या रात्रीपासून सोमवार २५ जानेवारीच्या सकाळपर्यंत विशेष ब्लॉक घेऊन काम पूर्ण केले जाणार आहे.

ब्लॉक असल्यामुळे कुर्ला आणि ठाणे येथून २४ आणि २५ जानेवारी रोजी रात्री १२.३० ते पहाटे ५.३० पर्यंत एकही लोकल (उपनगरीय सेवा) सुटणार नाही. तसेच २३ आणि २४ जानेवारीच्या रात्री सुटणार असलेल्या निवडक लांब पल्ल्याच्या विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

कोरोना संकट सुरू आहे. यामुळे प्रवाशांनी मास्क घालणे, सोशल डिस्टंस राखणे, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याच्या नियमांचे पालन करणे तसेच कोविड प्रोटोकॉल आणि रेल्वे परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे, असेही आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

०७०५८ सिंकदराबाद-मुंबई स्पेशल जेसीओ
०७३१७ हुबळी-एलटीटी स्पेशल जेसीओ
०७०५७ मुंबई-सिंकदराबाद स्पेशल जेसीओ
०७३१८ एलटीटी-हुबळी स्पेशल जेसीओ (२४ आणि २५ जानेवारी रोजी रद्द)

अंतिम स्थानकात ब्लॉक काळासाठी बदल (फक्त २३ आणि २४ जानेवारीसाठीचा बदल)

०२११६ सोलापूर-मुंबई स्पेशल जेसीओ – शेवटचे स्थानक पुणे
०१११२ मडगाव मुंबई स्पेशल जेसीओ – शेवटचे स्थानक पनवेल

अंतिम स्थानकात ब्लॉक काळासाठी बदल (फक्त २२ आणि २३ जानेवारीसाठीचा बदल) – दादर, ठाणे अथवा कल्याणमध्ये थांबणार

०१०२० भुवनेश्वर मुंबई स्पेशल जेसीओ
०२५४१ गोरखपूर-एलटीटी स्पेशल जेसीओ
०२८१० हावडा-मुंबई स्पेशल जेसीओ
०११३४ मंगळुरू जंक्शन-मुंबई स्पेशल जेसीओ
०२७०२ हैदराबाद-मुंबई स्पेशल जेसीओ
०११४० गदग-मुंबई स्पेशल जेसीओ
०११४२ आदिलाबाद-मुंबई स्पेशल जेसीओ
०५२६७ रक्सौल-एलटीटी स्पेशल जेसीओ – २३ जानेवारी
०२१०६ गोंदिया-मुंबई स्पेशल जेसीओ – २३ आणि २४ जानेवारी
०२१३८ फिरोझपूर-मुंबई स्पेशल जेसीओ
०२१९० नागपूर-मुंबई स्पेशल जेसीओ – २३ आणि २४ जानेवारी

गाड्या सुटण्याच्या पहिल्या स्थानकात ब्लॉक काळासाठी बदल (फक्त २३ आणि २४ जानेवारीसाठीचा बदल)

०१३०१ मुंबई-केएसआर बंगळुरू स्पेशल जेसीओ मुंबई सीएसएमटी ऐवजी पुण्यातून सुटणार
०१११३ मुंबई-मडगाव स्पेशल जेसीओ मुंबई सीएसएमटी ऐवजी पनवेलहून सुटणार

ब्लॉकमुळे २३ आणि २४ जानेवारीला उशिरा धावणार असलेल्या गाड्या

०२६२० मंगळुरू सेंट्रल-एलटीटी स्पेशल जेसीओ सकाळी ६.३५ ऐवजी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी एलटीटी येथे पोहोचेल

०१००४ सावंतवाडी रोड-दादर स्पेशल जेसीओ सकाळी ६.४० ऐवजी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी दादर येथे पोहोचेल

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

चाकरमान्यांना ठाकरे सरकार चा मोठा दिलासा

Team webnewswala

कोपरी रेल्वे पूल मार्चअखेरीस खुला

Web News Wala

देवनारमध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मिती आणखी एक प्रकल्प

Web News Wala

Leave a Reply