Team WebNewsWala
पर्यावरण शहर समाजकारण

लवकरच मुंबईतील नद्या होणार प्रदूषणमुक्त

कोणे एके काळी निर्मळ पाण्याने झुळुझुळु वाहणाऱ्या मुंबईतील मिठी, दहिसर, पोयसर आणि ओशिवरा नद्या कालौघात मलजल आणि सांडपाण्यामुळे प्रदूषित झाल्या असून या नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी व्यापक प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आ

कोणे एके काळी निर्मळ पाण्याने झुळुझुळु वाहणाऱ्या मुंबईतील मिठी, दहिसर, पोयसर आणि ओशिवरा नद्या कालौघात मलजल आणि सांडपाण्यामुळे प्रदूषित झाल्या असून या नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी व्यापक प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात नद्यांमध्ये सोडण्यात येणारे मलजल, सांडपाणी अन्यत्र वळविण्यात येणार आहे. मिठी, दहिसर, पोयसर, ओशिवरा नद्यांमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी, मलजल रोखण्यासाठी प्रकल्प.

नद्यांना आले नाल्यांचे रूप 

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात नद्यांमध्ये सोडण्यात येणारे मलजल, सांडपाणी अन्यत्र वळविण्यात येणार आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर नद्या ८० टक्के प्रदूषणमुक्त होऊ शकतील, असा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मुंबईमध्ये मिठीबरोबरच दहिसर, पोयसर आणि ओशिवरा या मुख्य नद्या असून एके काळी या नद्यांचा परिसर वृक्षवल्लींनी नटलेला होता.

नद्यांच्या काठावर अनधिकृत बांधकामांचा विळखा

मात्र कालौघात या नद्यांच्या काठावर अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला. काही ठिकाणी इमारती उभ्या राहिल्या, तर काही ठिकाणी किनाऱ्याची जागा झोपडपट्टय़ांनी व्यापली. काही ठिकाणी कारखाने उभे राहिले. लगतच्या इमारती, झोपडपट्टय़ा आणि कारखानांमधील सांडपाणी, तसेच मलजय या नद्यांमध्ये सोडण्यात येत आहे. नदीकाठावर भरणी करून अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. यामुळे नद्यांना नाल्यांचे रूप आले असून या नद्या प्रदूषित झाल्या आहेत.

मुंबई महापालिकेने दहिसर, पोईसर आणि ओशिवरा नद्या प्रदूषणमुक्त करून त्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुनर्विकास योजना हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी कृती आराखडाही तयार करण्यात आला. या आराखडय़ानुसार चार टप्प्यांमध्ये विविध कामे हाती घेऊन मुंबईतील नद्या प्रदूषणमुक्त करण्यात येणार आहेत.

चार टप्प्यांमध्ये नद्या होणार प्रदूषणमुक्त

पहिल्या टप्प्यात मिठी नदीकाठी १.६४ किलोमीटर लांबीची मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, तर टप्प्याटप्प्याने मिठी नदीकिनाऱ्यालगत १०.१६ किलोमीटर लांबीची मलनिस्सारण वाहिनी टाकण्यात येणार आहे.

त्याचबरोबर दहिसर नदीच्या किनाऱ्यालगत ४.४२ किलोमीटर, पोयसर नदीलगत ८.६७ किलोमीटर, तर ओशिवरा नदीकाठी ४.७२ किलोमीटर लांबीच्या मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या कामाच्या निविदांचा मसुदा तयार करण्यात येत आहे. पुढील वर्षांत या कामासाठी सुमारे २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नद्यांमधील ८० टक्के प्रदूषणाला आळा बसू शकेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

कोविड 19 जनजागृती अभियान अंतर्गत ऑनलाइन विचारमंथन

Team webnewswala

आधार क्रमांक किती वेळा वापरले आहे तपासा मोबाईल वरून

Web News Wala

‘ग्लोबल टीचर’ रणजितसिंह डिसले ना राज्यपाल नियुक्त आमदार करा

Team webnewswala

Leave a Reply