Team WebNewsWala
Other तंत्रज्ञान व्यापार

५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा फोन Jio Phone 5

रिलायन्स जिओने आपल्या जिओ फोन युजर्सला मोठे गिफ्ट देत यूपीआय सपोर्ट देणे सुरू केले आहे. म्हणजेच आता जिओच्या फीचर फोनमध्ये देखील स्मार्टफोन यूजर्सप्रमाणे यूपीआय पेमेंट करू शकणार आहेत. मागील अनेक महिन्यांपासून या फीचरचे टेस्टिंग सुरू होते.

नवी दिल्ली – १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत ४ जी एलटीई फोनच्या लाँचिंगनंतर रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रात अक्षरशः धुमाकूळ घातल्यानंतर जिओने जिओ फोन २ ला अपग्रेडेड व्हेरियंट म्हणून लाँच केल्यानंतरही जिओ फोनची जोरदार विक्री होत आहे.

६९९ रुपयांत जिओ फोन खरेदी केला जात आहे. पण आता आणखी एक सर्वात स्वस्त हँडसेट बाजारात उतरवण्याची योजना रिलायन्स जिओ बनवत आहेत.

जिओ फोनचा स्वस्त व्हेरियंट म्हणून JioPhone 5 ला लाँच केले जाऊ शकते.
soon reliance jio will launch jio phone 5 under 10 doller

यासंदर्भात 91Mobiles च्या एका रिपोर्टवरून ही माहिती समोर आली आहे. सध्या जिओ फोन ५ वर काम सुरु असून जिओचा हा नवीन फोन सुद्धा एक फीचर फोन असणार आहे.

soon reliance jio will launch jio phone 5 under 10 doller

ओरिजनल जिओ फोनचा जिओ फोन ५ एक लाइट व्हर्जन असणार आहे.

सध्याच्या किंमतीत जिओ फोन विकला जाणार आहे. लीक्सच्या माहितीनुसार, ३९९ रुपये किंमतीत जिओ फोन ५ लाँच केला जावू शकतो.

म्हणजेच हा आतापर्यंत बाजारात येणारा सर्वात स्वस्त फोन असणार आहे. आतापर्यंतचे जिओचे रेकॉर्ड पाहिल्यास फीचर फोनमध्ये एलटीई कनेक्टिविटी असण्याची शक्यता आहे.

जिओ ५ मध्ये ४जी एलटीईसोबत KaiOS प्लॅटफॉर्म दिला जावू शकतो. म्हणजेच यात इंटरनेट ब्राऊजरसोबत काही अ‍ॅप्स आधीपासून फोनमध्ये दाखल असतील,

Wats app, गुगल, फेसबुक यासारखे अ‍ॅप्स फोनमध्ये प्री लोडेड असतील.

त्याचबरोबर रिपोर्टमध्ये असे देखील म्हटले की, जिओ फोन ५ चे सर्व नंबर्सवर फ्री कॉल असेल. इंटरनेटचा वापर करण्यासाठी वेगळा रिचार्ज पॅक घ्यावा लागेल. जिओ फोनसाठी सध्याच्या प्लॅनसाठी जिओ फोन ५ किंवा जिओ फोन लाइट युजर्संसाठी आणले जाऊ शकते. नवीन जिओ फोनसाठी काही स्वस्त प्लॅन सुद्धा जिओ लाँच करण्याची शक्यता आहे.

soon reliance jio will launch jio phone 5 under 10 doller

  • ओरिजनल जिओ फोनप्रमाणे एक छोटा एलसीडी डिस्प्ले आणि कीपॅड फोनची किंमत कमी ठेवण्यासाठी फोनमध्ये दिला जाऊ शकतो.
  • वाय फाय आणि ब्लूटूथ कनेक्टिविटी देखील जिओ फोन लाइटमध्ये दिली जाण्याची शक्यता कमी आहे.
  • फोनची किंमत कमी असल्याने यात कॅमेरा नसेल.
  • लिमिटेड स्टोरेज असल्याने फोनमध्य अ‍ॅप्स डाउनलोड केले जाणार नाहीत.
जिओ फोन ५ च्या लाँचिंगसंदर्भात कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण या वर्षी किंवा पुढील वर्षी जिओ स्मार्टफोनसोबत हा फोन लाँच केला जाऊ शकतो.
हे ही वाचा
लॉकडाउन इफेक्ट दूरसंचार कंपन्यांनी एप्रिलमध्ये गमावले ८२ लाख ग्राहक 
Netflix आणणार स्वस्त मस्त Mobile+ प्लान 
अ‍ॅपलची मोठी घोषणा! ‘आयफोन’ मधील ‘I’ आता India 
सॅमसंग चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्जर शिवाय 
नवीन फिचर्स आणत Telegram ची Wats app ला टक्कर 
आत्मनिर्भर भारत अ‍ॅप चॅलेंजला प्रचंड प्रतिसाद
आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

‘HotShots’ वेबसिरीज ॲपवर बंदी

Team webnewswala

महाजॉब्ज’वर नोंदणी करणाऱ्यांना आता कौशल्य विकास प्रशिक्षण

Team webnewswala

महाड दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात देणाऱ्या संस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

Team webnewswala

2 comments

गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण - Web News Wala August 2, 2020 at 5:23 pm

[…] ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा फोन Jio Phon… […]

Reply
चिनी स्मार्टफोनला भारतीय Lava ची टक्कर - Team WebNewsWala October 7, 2020 at 5:03 pm

[…] ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा फोन Jio Phon… […]

Reply

Leave a Reply