Team WebNewsWala
पर्यावरण शहर

लवकरच मुंबईचे खारट पाणी होणार गोड

मुंबईचे खारट पाणी गोड करण्यासाठीच्या नि:क्षारीकरण प्रकल्पप्रस्तावास स्थायी समितीची मंजुरी

मुंबईचे खारट पाणी गोड करण्यासाठीच्या नि:क्षारीकरण प्रकल्पप्रस्तावास स्थायी समितीची मंजुरी

मुंबई :  समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्यासाठी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारण्याचा पालिकेने घाट घातला आहे. या प्रकल्पातून दररोज २० कोटी लिटर पाणी मिळेल असा दावा प्रशासनाने केला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये  मंजूर झाला. यासाठी इस्रायलमधील एका कंपनीने पालिकेला या प्रकल्पाबाबत प्रस्ताव दिला आहे. त्यावरून पालिकेने आता हा तब्बल साडे तीन हजार कोटींचा प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले आहे.

मनोरी येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत उपलब्ध असलेल्या १२ हेक्टर जागेवर संयंत्र उभारले जाणार आहे.

मुंबईला दररोज सात धरणांतून ३८० कोटी लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र एखाद्या वर्षी पाऊस कमी पडल्यास मुंबईकरांना १० ते १५ टक्के  पाणीकपातीला सामोरे जावे लागते. त्यातच येत्या काळात मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची मागणीही वाढणार आहे. त्यामुळे पालिकेने गारगाई पिंजाळ हे धरण प्रकल्प हाती घेतलेले आहेत. मात्र या प्रकल्पांना अद्याप वेग आलेला नसताना आता पालिकेने मुंबईचे खारट पाणी गोड करण्याचा प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले आहे.

प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम इस्त्रायली कंपनीला

या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम इस्त्रायली कंपनीला देण्यात येणार असून त्याकरिता पालिका साडे पाच कोटी रुपये देणार आहे. तसेच मसुदा निविदा बनवण्यासाठी ४० लाख रुपये दिले जाणार आहे. मात्र प्रकल्प रद्द झाल्यास हे पैसे कंपनीने पालिकेला परत करायचे आहेत.

कोणत्याही प्रकल्पासाठी निविदा मागवून लघुत्तम निविदाकाराला काम देण्याची पद्धत पालिकेत प्रचलित आहे. मात्र या प्रकल्पासाठी इस्त्रायली कंपनीला मूळ सूचक म्हणून नेमले आहे. राज्य शासनाच्या अधिनियम ‘महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एनेब्लिंग ऑथोरिटी अ‍ॅक्ट’नुसार या कंपनीने हा प्रस्ताव सादर केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या कायद्यांतर्गत अनाहूत प्रस्ताव सादर करण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहे. त्यानुसार हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर बांधला जाणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्टय़े

दर दिवशी २० कोटी लिटर पाण्याचे नि:क्षारीकरण करता येणार, त्याचा विस्तार ४० कोटी लिटपर्यंत करता येणार.

या प्रकल्पासाठी ६ हेक्टरची जागा आवश्यक असून विस्तार के ल्यास ८ हेक्टर जागेची गरज

सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्यास ८ महिने व प्रत्यक्ष बांधकामास ३० महिने कालावधी लागू शकतो.

या प्रकल्पाचा ढोबळ अंदाजित खर्च ३५२० कोटी इतका आहे. त्यात १६०० कोटी भांडवली खर्च व १९२० कोटी हा प्रचालन व परिरक्षण खर्च आहे.

शुद्ध पाण्याच्या प्रति किलो लिटरसाठी सुमारे ताशी ४ किलोवॅट इतक्या विजेच्या आवश्यकता आहे. हा विजेचा खर्च महापालिका देणार आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

राज्यात सव्वादोन लाख सरकारी पदे रिक्‍त

Team webnewswala

Paws Dombivali चा महाशिवरात्री निमित्त अनोखा उपक्रम

Web News Wala

मल्टिप्लेक्सच्या प्रत्येक खेळासाठी १००० रुपये रंगभूमी कर

Team webnewswala

Leave a Reply