Team WebNewsWala
क्राईम तंत्रज्ञान राष्ट्रीय समाजकारण

‘HotShots’ वेबसिरीज ॲपवर बंदी

‘HotShots’ वेबसिरीज ॲपवर येणार बंदी? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेबमिडिया असोसिएशनचे प्रदेश अद्यक्ष अनिल महाजन करणार तक्रार.
‘HotShots’ वेबसिरीज ॲपवर बंदी ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे
वेबमिडिया असोसिएशनचे प्रदेश अद्यक्ष अनिल महाजन करणार तक्रार.

डिजिटल इंडियाच्या युगात इंटरनेटचा वापर चांगल्या कामासाठी करण्याऐवजी देशातील युवा पिढी भलत्याच कामांसाठी करत असल्याचे दिसत आहे. याला सर्वस्वी जबाबदार बॉलिवुडमधील ‘प्रोड्युसर माफिया गँग’ आहे. विदेशात सुरु केलेले ‘HotShots’’ वेबसिरीज ॲप हा त्यातलाच भाग असल्याची शंका घेण्यास वाव आहे. या वेबसिरीज ॲप च्या माध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या शॉर्ट फिल्म अश्लील आहेत. ज्याला देशातील युवा पिढी भुलत आहे. या शॉर्ट फिल्म डाऊनलोड करण्यासाठी युजर्सकडून पैसेही उकळले जात आहेत, या सर्व प्रकाराची चौकशी करावी यासाठी वेब मिडिया असोसिएशन मुंबई प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहेत.

ॲप च्या माध्यमातून प्रसारित शॉर्ट फिल्म अश्लील 

‘HotShots’ वेबसिरीज ॲपवर बंदी ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेबमिडिया असोसिएशनचे प्रदेश अद्यक्ष अनिल महाजन करणार तक्रार.अनिल महाजन यांनी माहिती देताना सांगितले की, या HotShots Entertainment वेबसिरीज ॲप च्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या शॉर्ट फिल्म अश्लील आहेत. या वेब सिरीजच्या माध्यमातून देशातील युवा पिढीवर चुकीचे संस्कार होत आहेत.काही बॉलिवूड प्रोड्युसर माफिया हा स्वत:चा व्यवसाय वाढवण्यासाठी या गोष्टींचा वापर करत आहे. परंतू, देशहीत लक्षात घेता त्याला कोणी थांबवणार आहे की नाही ? असा सवालही अनिल महाजन यांनी उपस्थित केला आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांनी केली तक्रार

दरम्यान, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या काही सजग लोकांनी वेब मीडिया असोसिएशन अध्यक्ष अनिल महाजन यांच्या कार्यालयात तक्रार केली आहे. या तक्रारीबाबत अनिल महाजन यांनी सांगितले की, ‘माहिती प्रसारण मंत्रालयाकडून ‘हॉट अँड शॉर्ट’ या वेब सिरीज ॲपला कायदेशीर परवानगी मिळाली आहे का? असेल तर त्याची कॉपी वेब मीडिया असोसिएशन कडे देण्यात यावी.

दरम्यान, विदेशी नागरिकत्वाचा फायदा घेत काही प्रोड्युसर माफिया गेंग कडून मनीलॉण्ड्रींगही होत असण्याची शक्यता आहे.’

हॉट अँड शॉर्ट’ ॲप बेकायदेशीर

‘HotShots’ वेबसिरीज ॲपवर बंदी ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेबमिडिया असोसिएशनचे प्रदेश अद्यक्ष अनिल महाजन करणार तक्रार.

पुढे बोलताना अनिल महाजन म्हणाले, ‘हॉट अँड शॉर्ट’ ॲप बेकायदेशीर आहे. याबाबत आम्ही वेब मिडिया असोसिएशन मुंबई तर्फे केंद्रीय मंत्री माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व महाराष्ट्र पोलीस महासंचालक एस. के. जैस्वाल यांच्याकडे रितसर तक्रार दाखल करणार आहे. तसेच, राज कुंद्रा याच्या ‘HotShots’ वेबसिरीज ॲपवर बंदी घालण्यात यावी याबाबत वेबमिडिया असोसियन मुबंई च्या वतिने पत्रकार परिषद घेऊन कार्यवाही करणे बाबत मागणी करण्यात येईल व तक्रार करून पाठपुरावा करण्यात येणार आहे.’ असेही महाजन म्हणाले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

कोरोनातून सावरताच लहान मुलांना नव्या आजाराचा धोका

Web News Wala

Jio आणि Airtel मध्ये करार, JIo ग्राहकांना होणार फायदा

Web News Wala

मुंबईकरांचे Property Card आता eProperty card ॲपवर

Web News Wala

Leave a Reply