Team WebNewsWala
क्राईम शहर

अरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त

अंडरवर्ल्ड डॉन ते राजकारण असा प्रवास करणाऱ्या अरुण गवळीचं मुंबईतील निवास्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दगडी चाळ

अरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त

Webnewswala Online Team 

दगडी चाळ मधील सर्व १० इमारतींचा पुनर्विकास होणार
अरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त
दगडी चाळ च्या जागी ४० मजली दोन टॉवर
“पुनर्विकासासाठी लवकरच बिल्डरला ना हरकत प्रमाणपत्र दिलं जाईल. दरम्यान भाडेकरुंसाठी इरादा पत्र मंजूर झालं आहे. त्याआधी एमबीआरआरबी पात्र भाडेकरुंची यादी तयार करणार आहे,” असंही घोसाळकर यांनी सांगितलं आहे.

प्राथमिक योजनेनुसार दगडी चाळीच्या जागी ४० मजली दोन टॉवर उभारण्यात येणार आहेत. यामध्ये मूळ भाडेकरुंसाठी घरं असतील आणि उर्वरित घरं विक्रीसाठी उपलब्ध असतील. दगडी चाळीत एकूण ३३८ भाडेकरु असून अरुण गवळी संपत्तीचा मालक आहे. अरुण गवळीने पुनर्विकासाठी म्हाडाकडे प्रस्ताव पाठवला होता. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर म्हाडाकडून प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

“सध्या एमबीआरआरबीला या प्रकल्पात किती घऱं मिळतील हे निश्चित नाही. इरादा पत्र हे फक्त पहिलं पाऊल आहे. नंतर यामध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे,” असं घोसाळकर यांनी सांगितलं आहे. १० इमारतींमध्ये प्रत्येकी चार मजले असून यामधील दोन इमारती धोकादायक असल्याने आधीच पाडण्यात आल्या आहेत. यामुळे प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत त्या मोकळ्या जागेत भाडेकरुंसाठी तात्पुरती राहण्याची सोय केली जाईल.

शिवेसना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी जेलमध्ये 

अरुण गवळीमुळे दगडी चाळ प्रसिद्ध असून शिवेसना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी सध्या तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याला नागपूर जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एप्रिल महिन्यात त्याला ४५ दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता.

Title – अरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त ( soon arun gawalis dagadi chawl will be demolished )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

मृत अजगराचे फोटो व्हायरल सात जणांविरूद्ध गुन्हा

Team webnewswala

माघी गणेशोत्सवात ‘POP’ बंदीस स्थगिती

Web News Wala

1 April पासून वीजदर होणार कमी

Web News Wala

Leave a Reply