Team WebNewsWala
Other नोकरी राष्ट्रीय समाजकारण

रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सोनू सूद चे एअरलिफ्ट

Sonu Sood's airlift for Indian students stranded in Russia

करोना संकटाच्या काळात अभिनेता सोनू सूद ने अनेक गरजुंना मदत केली आहे. आतापर्यंत देशातील विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी पाठविल्यानंतर सोनू सूद ने त्याचा मोर्चा विदेशात अडकलेल्या भारतीयांकडे वळविला आहे.

काही दिवसापूर्वी सोनू सूद ने किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या जवळपास ६ हजार विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप आणलं होतं. त्यानंतर आता रशियात अडकलेल्या १०१ विद्यार्थ्यांनादेखील परत मायदेशात आणलं आहे.

करोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. या काळात सारं काही बंद असून आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील बंद असल्याचं पाहायला मिळत आहे.

मात्र या संकटकाळात विदेशात अडकलेल्या भारतीयांना पुन्हा देशात सुखरुप आणण्यासाठी सोनू मदत करत आहे.

नक्की वाचा >>  
तंबाखूपासून कोरोना प्रतिबंधक लस, लवकरच होणार मानवी ट्रायल

राज्यातील करोनाबाधित पोलिस १० हजारांच्या घरात

रशियात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या जवळपास १०१ विद्यार्थ्यांसाठी सोनूने विमानाची सोय केली होती. त्यामुळे हे विद्यार्थी बुधवारी सुखरूप परतले आहेत. यातील १०० विद्यार्थी चेन्नईमधील असून १ विद्यार्थी दिल्लीतील आहे. सध्या हे विद्यार्थी क्वारंटाइन झाले आहेत.

दरम्यान, गरजुंना मदत करण्यासोबतच आता सोनूने प्रवासी रोजगार.कॉम ही वेबसाईटदेखील सुरु केली आहे. या कंपनीत तो जवळपास ३ लाख मजुरांना नोकऱ्या देणार आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पद्म पुरस्कार समिती अध्यक्षपदी आदित्य ठाकरे

Team webnewswala

Netflix आणणार स्वस्त मस्त Mobile+ प्लान

Team webnewswala

वैष्णोदेवी यात्रेला सुरूवात २ हजार भाविकांनाच दर्शन

Team webnewswala

Leave a Reply