Team WebNewsWala
आरोग्य

व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेची काही लक्षणं

व्हिटॅमिन B12 ची कमतरता हे थकवा येण्याचं प्रमुख कारण मानलं जातं. त्यामुळे शरीरात या व्हिटिमिनची कमतरता असल्यास त्यावर उपाय करणं आवश्यक आहे.

अनेक जणांना रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे थकवा येण्याची समस्या उद्भवू लागते. अनेकांना झोप, शारिरीक काम, आहार, तणावामुळेही सतत थकवा येत असतो. थकवा येणं हा एखाद्या रोगाचा संकेतही असू शकतो. व्हिटॅमिन B12 ची कमतरता हे थकवा येण्याचं प्रमुख कारण मानलं जातं. त्यामुळे शरीरात या व्हिटिमिनची कमतरता असल्यास त्यावर उपाय करणं आवश्यक आहे.

जाणून घ्या शरीरातील व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेची काही लक्षणं –

थकवा येणं

काही वेळ चालल्यावर लगेचच थकवा जाणवणं

दूरचं किंवा लांबचं दिसण्यास त्रास होणं

झोप न येणं

साधारण वजनाहून, अधिक वजन वाढणं

सतत तोंड येणं

श्वास घेण्यास त्रास होणं

त्वचा रखरखीत, सुकल्याप्रमाणे वाटणं

बद्धकोष्ठता, गॅसची समस्या

भूक कमी होणं, खाण्याची इच्छा न होणं

शरीर दुखणं

मानसिक समस्या, डिप्रेशन, मूड स्विंग

बी 12 व्हिटॅमिनची कमतरता असलेली व्यक्ती शरीरात ऑक्सिजन प्रसारित करण्यासाठी पुरेशा लाल रक्तपेशी तयार करु शकणार नाही.

मांस, अंडी, दूध, चीज असे पदार्थ खात नसलेल्या व्यक्तींना व्हिटॅमिन बी 12 चं सेवन करणं आवश्यक आहे. vitamin B12 ची लक्षणं आढळल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याच्या गोळ्या घेणं गरजेचं आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

करोना लसीचा पहिला डोस मिळणार भारतीय वंशाच्या व्यक्तीला

Team webnewswala

रिलायन्स : कर्मचारी आणि कुटुंबीयांचे मोफत लसीकरण

Web News Wala

आता पॅच चिकटवून घ्या करोना लस

Web News Wala

Leave a Reply