Team WebNewsWala
पर्यावरण शहर

भिवंडी – गॅरेज मध्ये घुसलेल्या सापाची सर्पमित्रांकडून सुटका

भिवंडी - कल्याण  मार्गावरील साईबाबा मंदिरासमोर राजेश सरोज याचे गॅरेज आहे. दुरुस्तीचे सुरु असतानाच काळया रंगांचे सापाचं पिल्लू गॅरेजमध्ये शिरले

भिवंडी गॅरेज मध्ये घुसलेल्या सापाची सर्पमित्रांकडून सुटका

भिवंडी – कल्याण  मार्गावरील साईबाबा मंदिरासमोर राजेश सरोज याचे गॅरेज आहे. या ठिकाणी दुचाकीच्या  दुरुस्तीचे काम आज दुपारच्या सुमारास सुरु असतानाच एक काळया चटयाबटया रंगांचे सापाचं पिल्लू अचानक गॅरेजमध्ये शिरले होते. त्या सापाला बघताच गॅरेजवाल्याने ओळखलं कि हा विषारी साप आहे. त्यामुळे त्याने सर्पमित्र हितेश यांच्याशी संपर्क करून गॅरेजमध्ये विषारी साप शिरल्याची माहिती दिली.

गॅरेजमध्ये सायलेंन्सर पाईपमध्ये अडकून बसला

माहिती मिळताच सर्पमित्र घटनस्थळी पोहचून या सापाचा गॅरेजमध्ये शोध घेऊन त्याला पकडले . मात्र हा साप घाबरून छोट्या सायलेंन्सर पाईपमध्ये घुसुन बसल्याने त्यात तो अडकून बसला होता. त्यांनतर सर्पमित्र हितेश याने पाईपासह या सापाला गॅरेज बाहेर आणून त्याची पाईपमधून सुटका करीत त्याला पकडले. साप पकडल्याचे पाहून गॅरेजवाल्यासह पोलीस व ग्राहकांनी सुटकेचा निश्वास घेतला.

सापाला नैसर्गीक अधिवासात सोडणार

हा साप अंत्यत विषारी असुन तो घोणस जातीचा आहे. आता या विषारी घोणसला वन अधिकाऱ्याच्या परवानगीने नैसर्गीक अधिवासात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र हितेश याने दिली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

भिवंडी दुर्घटना मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

Team webnewswala

ठाणे शहराला लवकरच मिळणार नवा विकास आराखडा

Team webnewswala

गणेशोत्सवासंदर्भात मुंबई पुण्यासाठी नियमावली जाहीर

Team webnewswala

Leave a Reply