Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय व्यापार

मंदीत Smartphone मार्केटमध्ये चांदी

कोरोना महामारीमुळे अनेक क्षेत्रांत आर्थिक मंदी दिसत आहे. असं असलं तरी जागतिक smartphone मार्केटमध्ये मात्र धडाका दिसून येत आहे.

मंदीत Smartphone मार्केटमध्ये चांदी

Webnewswala Online Team – कोरोना महामारीमुळे अनेक क्षेत्रांत आर्थिक मंदी दिसत आहे. असं असलं तरी जागतिक smartphone मार्केटमध्ये मात्र धडाका दिसून येत आहे. एका नव्या अहवालानुसार 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर स्मार्टफोनचे शिपमेंट 138 कोटी युनिटपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. 2020च्या तुलनेत ही वाढ 7.7 टक्के आहे, तर 2015 नंतरची ही सर्वाधिक वाढ असेल.

इंटरनॅशनल डेटा कॉर्पाेरेशनच्या वल्र्डवाईड क्वार्टरली मोबाईल फोन ट्रॅकरच्या अहवालानुसार अनेक देशांमध्ये स्मार्टफोनच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या शिपमेंटमध्ये दरवर्षी सुमारे 3.8 टक्के वाढ होईल. पुढील वर्षी तर शिपमेंट 143 कोटी युनिटपर्यंत पोचण्याची शक्यता आहे.

5-जी फोन आल्यामुळे स्मार्टफोन खरेदीत वाढ

कोरोनाच्या संकट काळात पीसी, टॅबलेट, टीव्ही आणि स्मार्ट होम डिव्हायसेस सारख्या वस्तू जास्त प्रमाणात खरेदी करत आहेत. त्यामुळे खरंतर स्मार्टफोन मार्केटसमोर मोठे आव्हान होते. मात्र आश्चर्य वाटतंय की, कोरोना काळात स्मार्टफोन मार्केटची उलाढाल काही कमी झाली नाही, उलट वाढली, असे मत वल्र्डवाईड मोबाईल डिव्हाईस ट्रॅकर्सचे अध्यक्ष रयान रिथ यांनी व्यक्त केले.

जागतिक मार्केटचा विचार करता 5-जी फोन आल्यामुळे स्मार्टफोन खरेदीत वाढ झाली आहे. 2021मध्ये 5-जी शिपमेंट सुमारे 130 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. या वर्षी एकट्या चीनमध्ये 5-जी फोनचे 50 टक्के मार्केट असेल. तसेच अमेरिकेतही 16 टक्के 5-जी फोनचे शिपमेंट असेल.

Web Title – मंदीत स्मार्टफोन मार्केटमध्ये चांदी ( smartphone industry boom in corona time )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

व्हिएतनाममध्ये हवेतून कोरोनाचा संसर्ग ? सापडला धोकादायक व्हेरिएंट

Web News Wala

महेंद्रसिंह धोनी खेळणार बिग बॅश लिगमध्ये ?

Team webnewswala

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा दबदबा

Team webnewswala

Leave a Reply